आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Jilha Parishad Panchayat Samiti Election

उमेदवारांना शपथपत्रातबनवाबनवी करणे महागात पडणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शपथपत्रात बनवाबनवी करणे उमेदवारास महागात पडणार आहे. शपथपत्रातील माहिती खोटी आढळल्यास संबंधित उमेदवाराला त्याचे सदस्यत्व गमवावे लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने याविषयीचे निर्देश जारी केले आहेत.
उमेदवारी अर्जासोबत निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वांची माहिती दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नामनिर्देशन पत्र देणे व स्वीकारणे ही प्रक्रिया पार पडेल. राखीव जागेवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराला जात वैधता प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडावी लागणार आहे. उमेदवारांना दोनपेक्षा जास्त अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र, संपत्ती व मालमत्तेचा तपशील, गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती याविषयीचे शपथपत्र सादर करावे लागते. निवडणूक निर्णय अधिकारी शपथपत्रातील माहितीची छाननी आणि सत्यता पडताळून पाहणार आहेत. माहिती चुकीची आढळल्यास सदस्यत्व रद्द करण्यात येईल. त्याविषयीचे अधिकार जिल्हा प्रशासनाकडे आहेत.
असे करावे लागेल शपथपत्र : राज्य निवडणूक आयोगाने विहित केलेल्या नमुन्यात शपथपत्र सादर करावे लागेल. 100 रुपयांच्या मुद्रांकावर हे शपथपत्र सादर करावे लागेल. नोटरी, पब्लिक अथवा शपथपत्र देण्यासाठी सक्षम अधिकार्‍यासमोर सत्यप्रत सादर करावी लागेल.
पक्षाकडून सूचना दिल्या जातात
शपथपत्राबाबत उमेदवारांना पक्षाकडून सूचना दिल्या जातात. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत फ ार मोठा खर्च होत नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीसारखी कसरत करावी लागत नाही. शपथपत्रात खोटी माहिती दिली तर त्यावर प्रतिस्पर्धी उमेदवारांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे उमदेवार चुकीची माहिती देत नाही. हरिभाऊ बागडे, ज्येष्ठ नेते, भाजप