आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Jilha Parishad Panchayat Samiti Election

औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेच्या इच्छुकांची संख्या पाचशेवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: जिल्हा परिषदेच्या 38 आणि पंचायत समितीच्या 76 जागांसाठी शिवसेनेच्या वतीने 475 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. इच्छुकांमध्ये उच्चशिक्षितांचा समावेश आहे. या वेळी कोठेही बंड होणार नसल्यामुळे शिवसेने लढवीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या 38 पैकी 33 जागा जिंकू असा दावा खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.
कालपासून मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभागृहात शिवसेना इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झाली होती. काल तीन जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर आज औरंगाबादसह सहा तालुक्यांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निम्म्या उमेदवार महिला असल्याने महिलांची गर्दीही तेवढीच होती.
सुशिक्षितांचा भरणा असल्यामुळे यंदा शिवसेनेला घवघवीत यश मिळेल, असा दावा खासदार खैरे यांनी केला. उद्या सायंकाळी उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी म्हणजेच 23 जानेवारीला उमेदवारी अर्ज भरले जातील, असेही त्यांनी सांगितले.
पंचायत समितीचे तरी तिकीट द्या
काही इच्छुकांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मागितली. मुलाखत सुरू असतानाच ‘साहेब, जिल्हा परिषदेचे जमत नसेल तर पंचायत समितीसाठी अमुक एका गणातून विचार करा’, असा पर्याय र्शेष्ठींसमोर ठेवला. मी पंचायत समितीला असलो म्हणजे जिल्हा परिषदेच्या उमेदवाराचे काम हलके होईल, अशीही सूचना केली.