आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - जिल्हा परिषदेचा बारा महिन्यांचा अर्थसंकल्प मंगळवारी (19 मार्च) अर्थ समितीचे सभापती डॉ. सुनील शिंदे यांनी बारा मिनिटांत वाचून दाखवला. बजेटमधील बहुतेक तरतुदींचा दै. ‘दिव्य मराठी’ने वर्तवलेला अंदाज खरा ठरल्याने बजेटचे औपचारिक वाचन होत असल्याची भावना उपस्थित जि.प. सदस्यांमध्ये होती. मुख्यालयात याविषयाची दिवसभर चर्चा होती. बजेटचा अंदाज वर्तवताना ज्या सूचना केल्या होत्या त्यावर अंमल करत ऐनवेळी रेन वॉटर हार्वेस्टिंग व मुलींना कराटे प्रशिक्षण देण्याच्या विषयांचा समावेश करण्यात आला.
2013-14 या वर्षात नऊ कोटी 46 लाख 31 हजार एवढे महसूल उत्पन्न गृहीत धरले असून गेल्यावर्षीच्या 16 कोटी 85 लाख 36 हजार रुपयांच्या शिल्लक रकमेसह 19 कोटी 81 लाख 24 हजार 510 6रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. बजेटमधील बहुतेक जुन्या योजना नव्याने जाहीर करण्यात आल्या असून यंदा कृषी योजना, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि मुलींसाठी कराटे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दै. ‘दिव्य मराठी’ने आठ कोटी रुपये शिलकीचे बजेट सादर होण्याची शक्यता वर्तवली होती. परंतु, प्रत्यक्षात जिल्हा परिषदेने 64 लाख रुपये शिलकीचे बजेट सादर केले.
ऐनवेळी विषयांचा समावेश
अर्थसंकल्प तयार झालेला असताना सभापतींनी ऐनवेळी दुष्काळाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सर्व इमारतींवर दहा लाख रुपये खचरून रेन वॉटर हार्वेसिं्टग करणे, तसेच पाचवी ते दहावीच्या मुलींना कराटे प्रशिक्षणासाठी दहा लाख रुपये खर्चाचा बजेटमध्ये समावेश केला.
आपल्यासाठीच आहे..
सिंचनासाठी दोन कोटी रुपयांची जास्तीची तरतूद केल्याचे दै. ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते. तोच प्रश्न जि. प. सदस्य मनाजी मिसाळ यांनी उपस्थित करून 94 लाखांवरून थेट तीन कोटी रुपये सिंचनासाठी तरतूद का केली? याची विचारणा केली. त्यावर जि. प. अध्यक्षा नाहिदाबानो पठाण यांनी ‘ ते आपल्यासाठीच आहे..’ असे उद्गार काढल्यावर मिसाळ शांत झाले. त्या वेळी सभापती डॉ. सुनील शिंदे यांनी यातून दुष्काळात सदस्यांचे सिंचन होणार असल्याचा चिमटा काढला.
अंदाज आणि विविध क्षेत्रांत केलेली तरतूद
कृषी योजनांचा विस्तार
कृषी योजनांच्या विस्तारासाठी एक कोटी तीन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ताडपत्री पुरवठा 9 लाख, एचडीपीई पाइप 5 लाख, थ्री एचपी पंप डिझेल संच पाच लाख, संगणक दुरुस्ती, विमा, इंधन एक लाख, सारा यंत्र व एचटीपी पॉवर स्प्रे पंप प्रत्येकी नऊ लाख आहेत. नाथषष्ठी यात्रेत पाणीपुरवठय़ासाठी पाच लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
सिंचन
सिंचनावर 94 लाख रुपयांवरून दोन कोटी रुपयांची अधिकची तरतूद यंदा करण्यात आली आहे. यात लहान पाटबंधार्याची कामे, परीक्षण व दुरुस्तीसाठी 50 लाख रुपये, तर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, पाझर तलाव, सिमेंट बंधार्यांच्या कामासाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली.
समाजकल्याण कडबा कटर-25 लाख
बांधकामासाठी निधी
बजेटमध्ये विश्रामगृह बांधकाम दहा लाख, विश्रामगृह दुरुस्ती 15 लाख, रस्त्याची दुरुस्ती एक कोटी 20 लाख रुपये, मुख्यालयासमोरील उद्यान काम पाच लाख रुपये व आरोग्य उपकेंद्राच्या निवास दुरुस्तीसाठी पाच लाख रु.
महिला बालकल्याण
अपंग महिला व इतर महिलांना साहित्य पुरवण्यासाठी 17 लाखांची तरतूद झाली असून पदाधिकार्यांच्या इंधनासाठी 40 लाखांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.