आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद - हे बाल हनुमान आहेत, कर्णपुरा यात्रेचे खास आकर्षण, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नवरात्रोत्सवामुळे शहरात सध्‍या चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. कर्णपुरा यात्रेतही उत्साहाला उधाण आलेले पहायला मिळत आहे. पहाटे 3 वाजतापासून सायंकाळी 11 वाजेपर्यंत हा परिसर भक्‍तांच्‍या गर्दीने फुललेला असतो. जिल्‍ह्यातील कानाकोप-यातून भाविक या यात्रेसाठी येतात.
विद्युत रोशनाईत सजलेले आकाशी पाळणे, झुले, मौका का कुवा, हिरालाल पन्‍नालाल, जादुचा प्रयोग अशा विविध खेळांसाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थांनी ही यात्रा सजली आहे. देवीचे दर्शन घेतल्‍यानंतर भाविकांचा मोर्चा विविध स्‍टॉलकडे वळताना दिसत आहे. चिमुकल्‍यांपासून वृद्धांपर्यंत भाविक या यात्रेत दिसत आहे.
चोख बंदोबस्‍त - पहिल्‍याच दिवसापासून येथे भाविकांनी गर्दी केली. त्‍यामुळे मंदिर परिसरात चोख बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे. पार्किंगसह, भविकांची पादत्राणे सांभाळण्यासाठी कार्यकर्ते येथे राबत आहेत. विविध खाद्यपदार्थ, लाकडी वस्‍तू, भांडी, गृहसजावटीच्या साहित्‍याने ही यात्रा सजली आहे.
यात्रेत महिलांच्या सुरक्षेवर भर
शेवटच्‍या दिवसात यात्रेत वाढणारी गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यात्रेत पोलिसांचा चोख बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक असल्‍याचे पोलिसांनी सांगितले. यात्रेमध्ये बालगुन्हेगारीचे प्रमाण अधिक असते, त्‍यामुळे विशेष खबरदारी घ्‍यावी लागते असेही पोलिसांनी सांगितले आहे.
बाल हनुमानाचे विशेष आकर्षण
बाल हनुमानाच्‍या वेशभुषेत काही चिमुकले या यात्रेमध्‍ये बसलेले आहेत. यात्रेत येणा-या प्रत्‍येक भाविकांचे ते लक्ष वेधत आहेत. कित्‍येकांना या चिमुकल्‍यांसोबत सेल्‍फी घेण्‍याचा मोह आवरता आला नाही.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, काय काय आहे यात्रेत..