आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर क्रांती चौक उड्डाणपुल तयार - शनिवारी होणार उद्घाटन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद । बहुचर्चित क्रांती चौक उड्डाणपुलाचे उद्घाटन शनिवारी (14 जुलै) सार्वजनिक उपक्रममंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जालना रोडवरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या वतीने 2009 मध्ये क्रांती चौक उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले होते. पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना निर्माणाधीन चार खांबांना तडे गेल्याने बांधकाम थांबवण्यात आले होते. समितीने दिलेल्या अहवालानुसार चार खांब आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवतालचा स्लॅब पाडण्यात आला. साडेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने या पुलाचे उद्घाटन लांबले होते. अखेर पुलाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक उपक्रममंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 14 जुलै रोजी येण्यास होकार दिला. मंत्रालयातील अग्निकांडामुळे अधिवेशनात गोंधळ होण्याची शक्यता असल्याने उपमुख्यमंत्री उद्घाटनास उपस्थित राहाण्याची शक्यता कमी असलीतरी त्यांनी होकार दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.