आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख.वि.संघावर भाजपची सत्ता, अध्यक्षपदी शेळके तर उपाध्यक्षपदी मुगदळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड- औरंगाबाद तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे अप्पासाहेब शेळके तर उपाध्यक्षपदी औताडे गटाचे अण्णासाहेब मुगदळ यांची निवड झाली आहे.

या संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी सोमवारी तालुका सहकारी उपनिबंधक कार्यालयात नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. यात अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून अप्पासाहेब शेळके यांनी तर काँग्रेस पॅनलमधून विजयी झालेले लक्ष्मण आैताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. बहुमताच्या आधारे हात उंचावून मतदान घेतले असता भाजपचे अप्पासाहेब शेळके यांच्या बाजूने आठ तर काँग्रेसचे लक्ष्मण औताडे यांच्या बाजूने सात मते पडली. त्यामुळे निर्वाचन अधिकारी दिनकर मसलेकर यांनी अप्पासाहेब शेळके यांना अध्यक्ष म्हणून विजयी झाल्याचे घोषित केले.

त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपच्या पॅनलकडून औताडे गटाचे अण्णासाहेब मुगदळ यांनी तर काँग्रेसच्या पॅनलकडून औताडे गटाचे अशोक काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तेव्हा भाजपच्या विश्वनाथ पठाडे, सुदाम उकर्डे, अप्पासाहेब शेळके, छायाबाई पवार, शशिकलाबाई उकर्डे, धनाजी तळेकर, शिवसेनेचे नाना पळसकर यांनी अण्णासाहेब मुगदळ यांना हात उंच करून मतदान केले. तर काँग्रेसच्या अशोक काकडे यांच्या बाजूने काँग्रेस पॅनलमधील पुंडलिक अंभाेरे, लक्ष्मण औताडे, मोहन काळे, गुलाब म्हस्के, दत्तू ठोंबरे, देविदास चव्हाण यांनी हात उंचावून मतदान केले.

अण्णासाहेब मुगदळ यांना आठ तर अशोक काकडे यांना सात मते मिळाली. एक मत जास्त मिळाल्याने अण्णासाहेब मुगदळ विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. सोमवारी सकाळी ११ वाजता घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून दिनकर मसलेकर यांनी काम पाहिले. त्यांना सहायक निर्वाचन अधिकारी आर.के. आर्य, व्ही.डी. कुलकर्णी तसेच खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक लक्ष्मण पोफळे, के.एस.पठाडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

डॉ. कल्याण काळे गटाने सात तर भाजपने सहा, भाजप बंडखोरांनी दोन जागा जिंकल्या. खरेदी-विक्री संघाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढवलेल्या निवडणुकीत विलासबापू औताडे गटाचे दोन उमेदवार विजयी झाले होते. औताडे गटाचा समर्थक म्हणवणाऱ्या अण्णासाहेब मुगदळ यांनी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे तालुका खरेदी-विक्री संघ भाजपच्या ताब्यात गेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन व्हाइस चेअरमन निवडताना काँग्रेेस-भाजपमध्ये काय राजकीय घडामोडी होतात, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

भाऊबंदकी, गटातटाचे राजकारण भोवले : लक्ष्मण औताडे
काँग्रेस-राष्ट्रवादीएकत्र येऊन निवडणूक लढलो होतो. यात राष्ट्रवादीचे संचालक काँग्रेसचे संचालक निवडून आले होते. तसेच राष्ट्रवादीचा चेअरमन काँग्रेसचा व्हाइस चेअरमन करण्याचे ठरले होते. या निवडणुकीचे नेतृत्व माजी आमदार डॉ. कल्याण काळे, पांडुरंग तांगडे, पुंडलिक अंभोरे यांनी केले होते. बहुमत असताना माझी चेअरमनपदी निवड होण्याच्या आधीच काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझा विश्वासघात केला असल्याचा आरोप संचालक लक्ष्मण औताडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. माझ्यासोबत भाऊबंदकी केली त्यांच्या विश्वासातील त्यांनी उमेदवारी दिलेला आणि काँग्रेकडून बिनविरोध निवडून आलेला मुगदळ याला भाजपच्या गोटात नेऊन सोडले. त्यामुळे माझा एका मताने पराभव झाला. मी ज्यांचे काम केले त्यांनीच ऐनवेळी माझा विश्वासघात केल्याचा आराेप लक्ष्मण औताडे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...