औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे नितीन पाटील यांच्यातच थेट लढत होणार, असे स्पष्ट संकेत असले तरी आम आदमी पार्टीचे सुभाष लोमटे आणि काँग्रेस बंडखोर तथा समाजवादी पार्टीचे उमेदवार अँड. सदाशिव गायके यांच्यामुळे मतविभाजन होणार असल्याने या लढतीला चार रंग आले आहेत. गायके माघार घेतील, अशी अनेकांची अटकळ होती. त्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्नही सुरू होते. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत गायके पक्षाच्या कार्यालयातून हलले नाहीत. ते मैदानात राहिल्यामुळे लढतीत एक रंग भरला गेला आणि काँग्रेसची डोकेदुखी कायम राहील.
माजी खासदार उत्तमसिंह पवार यांची नाराजी दूर करण्यात यश आल्यानंतर काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरू करण्यात आला. आजी-माजी आमदार, पदाधिकारी कामाला लागल्यामुळे खैरे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झाले. दिल्ली काबीज करणार्या ‘आप’कडून ज्येष्ठ कार्यकर्ते लोमटे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ही लढत तिरंगी होईल, अशी अटकळ असतानाच काँग्रेसचे जुने कार्यकर्ते अँड. गायके यांनी बंडाचा झेंडा घेतला आणि लढतीत रंजकता निर्माण झाली.
पुढे वाचा....