आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Loksabha Congress Candidate News In Marathi

मतदानाद्वारे काँग्रेस उमेदवार निवडीतून औरंगाबादची सुटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींच्या मतदानाद्वारे लोकसभेचा उमेदवार ठरवण्याच्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपक्रमातील 15 मतदारसंघांत औरंगाबादचा समावेश होता. परंतु आता येथील उमेदवार पारंपरिक पद्धतीनेच ठरवला जाईल, असे बुधवारी रात्री स्पष्ट झाले. यामुळे काही महिन्यांपासून फील्डिंग लावून तयार असलेल्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. राज्यात यवतमाळ व औरंगाबादेत हा प्रयोग होणार होता. आता सध्या काँग्रेसकडे असलेल्या लातूर व वर्धा येथे तो होणार आहे. लातूर येथे जयवंत आवळे, वर्धा येथे दत्ता मेघे खासदार आहेत. लातुरात नरेंद्र जाधव इच्छुक आहेत. औरंगाबाद वगळल्याचा सर्वाधिक आनंद मंत्रिमंडळात असलेल्या एका आमदाराला झाल्याचे समजते. यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे. तथापि, त्यास दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, प्रयोगात समावेश झाल्याचेही कळवण्यात आले नव्हते आणि वगळल्याचेही कळवलेले नाही, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी सांगितले.
इच्छुक व चर्चेतील चेहरे :
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा
उत्तमसिंह पवार
नितीन पाटील
दत्ता पाथ्रीकर
जे.के. जाधव
मिलिंद पाटील
डॉ. कल्याण काळे.