आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद विद्यापीठात लिपिक, शिपाईची नोकरीचे आमिष दाखवत दहा लाख रुपयांचा गंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: विद्यापीठात लिपिक, शिपाई पदावर कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या विद्यापीठातील लिपिक महिलेसह तिच्या फौजदार पतीविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन सूर्यभान पाचकर (३७, रा. हडको) यांनी १४ जून रोजी सिटी चौक पोलिसांत तक्रार दिल्यावर रंजना जगदाळे आणि बाळासाहेब जगदाळे (रा. एन-११, यादवनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पाचकर यांना नातेवाइकांकडून जगदाळे यांच्याविषयी माहिती मिळाली. पाचकर यांनी जगदाळे यांच्याशी संपर्क साधून नोकरीसंदर्भात चौकशी केली. तेव्हा जगदाळे यांनी त्याला शिपाई पदासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. सचिनने जगदाळे यांना पाच लाख रुपये दिले. जगदाळे यांनी पाचकर यांना बनावट नियुक्तीपत्र सुद्धा दिले. त्यामुळे ते विद्यापीठात कामावर रुजू होण्यासाठी गेले. परंतु विद्यापीठाकडून त्यांना हे नियुक्तीपत्र बोगस असल्याचे समजले. 
बातम्या आणखी आहेत...