आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांच्या राजीनाम्याबाबत आज मुंबईत महत्वाची बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापौर त्र्यंबक तुपे राजीनामा देणार की नाही आणि देणार असतील तर कधी याचे उत्तर शनिवारी मिळू शकते. शिवसेना नेते अनिल देसाई हे शनिवारी सकाळी विदेश दौऱ्याहून परतणार असून त्यांच्या उपस्थितीत यावर निर्णय होईल. एक महिन्यापासून महापौर आणि उपमहापौरांच्या राजीनाम्यावर शहरभर चर्चा सुरू आहे. युतीतील करारानुसार विद्यमान पदाधिकाऱ्यांचा दीड वर्षाचा कालावधी ३१ ऑक्टोबरला संपणार आहे. नेमकी तेव्हाच दिवाळी असल्याने नोव्हेंबरनंतरच राजीनाम्यावर निर्णय होणार हे स्पष्ट होते. शिवसेनेकडून शनिवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. महापौरपद भाजपकडे जाणार असल्याने शिवसेनेचा निर्णय झाला म्हणजे भाजपचाही निर्णय होणार हे स्पष्टच आहे.
महापौरांनी तातडीने राजीनामा द्यावा, असा शिवसेनेच्या एका गटाचा आधीपासूनच आग्रह होता. दुसरीकडे गोवा विधानसभा तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील वादामुळे शिवसेना काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु शिवसेनेकडून पालकमंत्री रामदास कदम, संपर्कनेते विनोद घोसाळकर, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याशी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी चर्चा केली असता सर्व काही ठरल्याप्रमाणे होईल, फक्त देसाई परतल्यानंतर निर्णय होईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे सेनेच्या कार्यकर्त्यांचे शनिवारच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

१५ नोव्हेंबरपूर्वी नवीन महापौर-उपमहापौर
ठरल्याप्रमाणेनोव्हेंबरला विद्यमान महापौर उपमहापौरांनी राजीनामा दिला तर १५ नोव्हेंबरपूर्वी या पदावर नवीन चेहरे विराजमान झालेले दिसतील. दोघांच्या राजीनाम्यानंतर विभागीय आयुक्तांना लेखी कळवले जाईल. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सात दिवसांचा अवधी असेल. त्यानंतर ही निवडणूक होईल. ही प्रक्रिया दहा ते पंधरा दिवसांत होईल. भाजपच्या महापौरांना करारानुसार एक वर्ष देण्यात आले असले तरी त्यातील पंधरा दिवस आधीच निघून जातील हे मात्र खरे.
बातम्या आणखी आहेत...