आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये महापौर घडमोडे यांचे दणक्यात भाषण, महापालिकेतील शिक्षण पद्धतीवर केले भाष्‍य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चीन दौऱ्यावर असलेले महापौर भगवान घडमोडे यांनी गुरुवारी चेंगडू शहरात स्थानिक महापौरांच्या उपस्थितीत आपल्या महापालिकेतील शिक्षण पद्धतीबाबत जोरदार भाषण केले. भाषणासाठी महापौरांना 8 मिनिटे देण्यात आली होती. घडमोडे यांनी इंग्रजीतून आपले विचार मांडले.
 
शाळांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या सुविधा, फर्निचर, मैदान, ग्रंथालय, प्रयोगशाळा, मुलांना पुरवण्यात येणारी मोफत पुस्तके गणवेश याचा उल्लेख त्यांनी केला. या वर्षी कोटी ५० लाख रुपयांची पुस्तके वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पिष्टमय पदार्थ, मेद, प्रथिने आणि खनिजे असलेला पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद करतानाच अपंग विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके, तीनचाकी सायकल, हिअरिंग एड्स, चष्मे, मोफत ऑपरेशन, फिजिओथेरपी सेंटर, वाहतूक भत्ता दिला जात असून आनंददायी शिक्षणावर भर दिला जात अाहे. येत्या काही महिन्यांत महानगरपालिका शाळा डिजिटल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
राठोड सायकलवर
भाजपचे गटनेते प्रमोद राठाेड यांना चीनमध्येही सायकल चालवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांना पंजाबचे गुरुलाल सिंग भेटले. ते तेथे हॉटेलमध्ये दरबान असून त्यांनी राठोड यांना सायकल दिली. त्यांनी चेंगडू शहरात १५ किमी सायकल चालवली. येथील सर्व लोक सायकलवरच फिरतात. दहा रुपये प्रतितास सायकल मिळते. ही आधुनिक सायकल असून त्यांना जीपीएस लावलेले आहे. क्यूआर कोड प्रत्येक सायकलला आहे. पेमेंटशिवाय त्याचा ऑटोमॅटिक लॉकही उघडत नाही.
बातम्या आणखी आहेत...