आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाला २७ कोटींना मुकावे लागणार, शौचालय, नळ जोडणी योजनेत दिरंगाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातीलअनुसूचित जातीच्या नवबौद्धांमधील हजारो नागरिकांना वैयक्तिक शौचालये नळ जोडणीसाठी २७ कोटी २८ लाख रुपये देण्यास राज्य सरकार एका पायावर तयार असताना केवळ तांत्रिक मंजुरीसाठी ३० लाख रुपये एक वर्षापासून मनपाने भरले नसल्याने ही योजना हातची जाण्याची वेळ आली आहे.

नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा स्वच्छता योजनेअंतर्गत शहरी भागातील अनुसूचित जाती नवबौद्ध कुटुंबांसाठी खासगी नळ जोडणी वैयक्तिक शौचालयासाठी निधी देण्याची राज्य सरकारची योजना आहे. औरंगाबाद मनपाने या योजनेसाठी प्रयत्न केल्यावर त्याला तत्त्वत: मान्यताही मिळाली. या योजनेनुसार शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपये तर नळ जोडण्यांसाठी चार हजार रुपये देण्यात येणार आहेत. महापालिकेने याबाबत मनपा हद्दीत सर्वेक्षण करून लाभार्थींची निवडही केली. त्यात एकूण १८ हजार ५४ लाभार्थी आहेत. त्यापैकी १५ हजार ९०६ कुटुंबांना शौचालय नळ अशी दोन्हींसाठी मदत दिली जाईल, तर १११६ जणांना फक्त शौचालये ९७२ जणांना फक्त नळ जोडण्यांचा लाभ दिला जाणार आहे.

यासाठी २७ कोटी २८ लाख रुपये निधी मनपाला मिळणार आहे. या प्रकल्पाच्या तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे काम देण्यात आले आहे. त्यांना मंजुरीसाठी तांत्रिक शुल्क म्हणून मनपाने ३० लाख ६४ हजार रुपये द्यावेत, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. हे ३० लाख रुपयेही नंतर मनपाला परत मिळणार आहेत. मनपाने या रकमेचा भरणा करावा यासाठी गेल्या वर्षी शासनाकडून पत्र आले होते. आता यालाही एक वर्ष होत आले असून मनपाने ही रक्कम अद्याप भरलेली नाही. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात या योजनेतून औरंगाबाद मनपा वगळली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

योजना हातून जाऊ देणार नाही
गेल्याआठवड्यात झालेल्या बैैठकीदरम्यान अवर सचिवांनी मनपाला पैसे भरण्याची मुदत सांगा, अशी विचारणा केली होती. पण तीही आजतागायत पाळण्यात आलेली नाही. याबाबत आयुक्त प्रकाश महाजन यांना विचारले असता त्यांनी ही योजना हातून जाऊ दिली जाणार नाही. शुल्काचे ३० लाख अदा करण्याचे निर्देश मुख्य लेखाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
ढिसाळ कारभार