आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Merit Student Now Get Scholarship Through NRI

गुणवंतांना ‘एनआरआय’चे बळ, औरंगाबादच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नॉर्थ साऊथ फाउंडेशन’चा उपक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अमेरिकेतील भारतीयांनी स्थापन केलेल्या ‘नॉर्थ साऊथ फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम औरंगाबादेतही राबवण्याचा निर्णय घेतला आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल, पॉलिटेक्निक, फार्मसी, डेंटलसारख्या अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.


संस्थेच्या औरंगाबाद शाखेचे काम नुकतेच सुरू झाले आहे. समन्वयक म्हणून मूळ औरंगाबादचे व सध्या अमेरिकेत डेट्रॉइट येथे कॅटरपिलर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले अभियंता जयंत रोपळेकर काम पाहत आहेत. त्यांनी सांगितले की, अमेरिकेत राहणा-या भारतीयांनी स्थापन केलेल्या या संस्थेने आतापर्यंत 4500 जणांना शिष्यवृत्ती दिली आहे. गेल्या वर्षी 2 हजार विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला या शिष्यवृत्तीमुळे हातभार लागला. पुण्यातील शाखेच्या वतीने 2009-10 मध्ये 44, 2010-11 मध्ये 85, तर 2011-12 मध्ये 127 जणांना शिष्यवृत्ती देण्यात आली. नॉर्थ साऊथ फाउंडेशनच्या भारतात बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, कोची, जोधपूर, कोलकाता, मदुराई, चंदिगडसह 26 ठिकाणी शाखा आहेत. महाराष्‍ट्रात पुणे आणि आता औरंगाबादचा त्यात समावेश करण्यात आला आहे.


रोपळेकर म्हणाले की, भारतात अनेक ठिकाणी संस्थेने शाखा सुरू करून शिष्यवृत्ती दिली आहे. मी औरंगाबादचा असल्याने शहरातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना ही संधी मिळावी यासाठी येथे शाखा सुरू करण्याचा दीड वर्षापासून प्रयत्न करीत होतो. औरंगाबादमधील विद्यार्थ्यांना यंदापासूनच ही शिष्यवृत्ती देण्याची आमची तयारी आहे. स्थानिक पातळीवर अ‍ॅड. अजित कडेठाणकर संस्थेचे काम पाहणार आहेत. दरवर्षी 15 हजार रुपये अशी ही शिष्यवृत्ती असेल. शिक्षण पूर्ण होईपर्यंत कामगिरी तपासून शिष्यवृत्तीचे नूतनीकरण केले जाणार आहे.


2010-11 मध्ये 85, तर 2011-12 मध्ये 127 जणांना शिष्यवृत्ती देण्यात आली. नॉर्थ साऊथ फाउंडेशनच्या भारतात बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, कोची, जोधपूर, कोलकाता, मदुराई, चंदिगडसह 26 ठिकाणी शाखा आहेत. महाराष्‍ट्रात पुणे आणि आता औरंगाबादचा त्यात समावेश करण्यात आला आहे.रोपळेकर म्हणाले की, भारतात अनेक ठिकाणी संस्थेने शाखा सुरू करून शिष्यवृत्ती दिली आहे. मी औरंगाबादचा असल्याने शहरातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना ही संधी मिळावी यासाठी येथे शाखा सुरू करण्यासाठी दीड वर्षापासून प्रयत्न करत होतो. औरंगाबादमधील विद्यार्थ्यांना यंदापासूनच ही शिष्यवृत्ती देण्याची आमची योजना आहे. स्थानिक पातळीवर अ‍ॅड. अजित कडेठाणकर संस्थेचे काम पाहणार आहेत. दरवर्षी 15 हजारांची ही शिष्यवृत्ती असेल. शिक्षण पूर्ण होईपर्यंत कामगिरी तपासून शिष्यवृत्तीचे नुतनीकरण केले जाणार आहे.


शिष्यवृत्तीविषयी
० विद्यार्थी दहावी अथवा बारावी अथवा सीईटी, जेईईमध्ये पहिल्या दहा क्रमांकांत असावा.
० इंजिनिअरिंग, मेडिकल, डेंटल, नर्सिंग, पॉलिटेक्निक, बी.एस्सी.(अ‍ॅग्री), बीफार्मसाठी प्रवेश निश्चित असावा.
० पालकांचे वार्षिक उत्पन्न 65 हजार रुपयांपेक्षा कमी
० शासकीय महाविद्यालयांत प्रवेश घेणा-यास प्राधान्य.
० इतर शिष्यवृत्ती मिळत नसेल अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य.
०शिष्यवृत्तीसाठी northsouth.org वर अर्ज करावा
०छाननीनंतर विद्यार्थी, पालकांची मुलाखत घेऊन निवड.


शिक्षणानंतर त्यांचाही हातभार हवा
पैशाअभावी हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही काम करणार आहोत. त्यांनीही शिक्षणानंतर या उपक्रमाला हातभार लावावा, अशी संस्थेची माफक अपेक्षा आहे.’
जयंत रोपळेकर, समन्वयक, नॉर्थ साऊथ फाउंडेशन