आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायम असलेले तुपाशी; कंत्राटी कामगार उपाशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाळूज औद्योगिक क्षेत्रात सध्या 'कुठे हसू तर कुठे रुसू' असे वातावरण आहे. कारखान्यांत राबणाऱ्या कायमस्वरूपी कंत्राटी कामगारांच्या कामाचे स्वरूप सारखे असले तरी त्यांच्या मिळकतीमध्ये मोठी तफावत आहे. हेच शल्य यंदाच्या दिवाळी बोनस वाटपामध्ये कामगारांना जड अंत:करणाने पचवावे लागणार आहे. त्यामुळे कायम कामगार तुपाशी, तर कंत्राटी कामगार उपाशी अशी चर्चा होत आहे.

वाळूज परिसरात दोन हजारांवर कारखाने आहेत. देशभरातील कामगारांची ये-जा सुरूच असते. त्यातील काही कामगार अनेक वर्षांपूर्वी कंपन्यांमध्ये दाखल झाले. ते कायमस्वरूपी काम करतात, तर नव्याने येणारे युवक कंत्राटदाराकडे रोजंदारीवर काम करतात. सध्या कंत्राटी कामगारांची संख्या परिसरात प्रचंड आहे. कारखानदारांकडून सेवा सुविधांचा कायम कंत्राटी कामगार, असे वर्गीकरण करूनच त्यांचा लाभ दिला जातो. कामगारांना दिवाळी सणाची ओढ महिनाभरापूर्वीपासूनच लागलेली असते. दिवाळी बोनसची सर्वच कामगारांना आशा असते. अनेक कंपन्यांमध्ये दिवाळी बोनससह कामगारांना खुश ठेवण्याचा कंपन्यांकडून प्रयत्न सुरू आहे. त्यासाठीच कामगारांना भेटवस्तू देण्यात येणार आहे. मात्र, व्हेरॉक आदी कारखान्यातील कामगारांना बोनससाठी संघर्ष करावा लागत आहे.

अनेक बड्या कारखान्यांत यंदा चांगला बोनस मिळणार असल्यामुळे कामगारांत आनंदाचे वातावरण आहे. काही कंपन्यांमध्ये मागील पगारवाढीसोबतच यंदाचा दिवाळी बोनस देण्याबाबत कामगार व्यवस्थापनामध्ये बोलणी सुरू आहे. त्यामुळे नेमका किती बोनस मिळणार याविषयी संभ्रम आहे. कायम कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना मात्र बोनसचा लाभ मिळणार नसल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे. उल्लेखनीय बाब अशी की, कायम कामगारांच्या तुलनेत मोठ्या संख्येत कमी पगारावर कंत्राटी कामगार काम करतात. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे.

कंपनीचाबोनस ठेकेदारांच्या खिशात : अनेकमोठे कारखाने कंत्राटी कामगारांना नियमाप्रमाणे बोनस देतात. त्यासाठी बोनसची रक्कम संबंधित कंत्राटी कामगारांच्या ठेकेदाराकडे दिली जाते. मात्र, ही रक्कम कंत्राटी कामगारांमध्ये वाटप करता स्वत:चे खिसे भरण्यातच ठेकेदार धन्यता मानतात.

किमानवेतनच नाही मग बोनसचे काय? औद्योगिकपरिसरातील कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कायम कामगारांच्या चार पट अधिक संख्येत असणाऱ्या कंत्राटी कामगारांवर नेहमीच अन्याय होत असतो. त्यांना किमान वेतन, ईएसआयसी सुविधा, पीएफ सुविधा आदींपासून वंचित ठेवण्यात ठेकेदार पटाईत आहेत. कायम कामगारांच्या बरोबरीने प्रसंगी अधिक काम करणाऱ्या या कंत्राटी कामगारांना वेतनात इतर सुविधांमध्ये अंतर ठेवून एकप्रकारे अन्याय केला जात असल्याची खंत कंत्राटी कामगार त्यांच्या कुटुंबीयांकडून होत आहे.
काही कायम, तर काही कंत्राटी कामगार असलेले वाळूज औद्योगिक क्षेत्र.

कारवाई करणार
कायदासर्वांसाठीसमान आहे, त्यानुसार कंत्राटी कामगारांनासुद्धा बोनस इतर सुविधा मिळायला हव्यात. मात्र, त्या सुविधा बोनस देण्यास नकार किंवा टाळाटाळ करणारे कारखाने निदर्शनास आले, तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई करणार. -अभय गिते, कामगार उपायुक्त
बातम्या आणखी आहेत...