Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Aurangabad Mit Collage Student Develop Vanraj Tractor

एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केला ‘वनराज’

प्रतिनिधी | Jun 07, 2012, 08:22 AM IST

  • एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केला ‘वनराज’

औरंगाबाद - सिडकोतील एमआयटी महाविद्यालयातील बी.एस्सी. ऑटोमोबाईल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शेतकर्‍यांसाठी उपयुक्त ठरणारा ‘वनराज’ ट्रॅक्टर विकसित केला आहे.
शेतकर्‍यांना सध्या मजुरांची कमतरता भेडसावत आहे. ती दूर करण्यासाठी हा ट्रॅक्टर तयार करण्यात आला आहे. त्यात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला असून तो अल्प किंमतीमध्ये उपलब्ध होऊ शकेल, असे एमआयटीतर्फे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. या ट्रॅक्टरवर वॉटर पंप, स्प्रे पंप, जनरेटर, ग्राईंडर तसेच शेतीची इतर कामे करणारी उपकरणे जोडलेली आहेत. मालवाहतूक, नांगरणी, कोळपणी, सरी पाडणे, वाफे तयार करणे, आंतरमशागत, पेरणी, पिकांना फवारणी, विहीरीतील पाण्याचा उपसा, शेती अवजारांना धार लावणे, विज निर्मिती, जनावरे धुणे आदी कामे करता येतील. ट्रॅक्टर विकसित करण्यासाठी सुबोध धुळे, किरण कावरे, गजानन वाघ, मुश्ताक शेख, सचिन लोखंडे, संकेत रत्नपारखी, लक्ष्मीकांत घाटे, युनूस शेख, नदीम शेख, स्वप्निल सपकाळ, झुबेर सय्यद, रोशन सुरासे, आशिष पिंगळे, मयूर संतू, शोएब काझी, मोईन पटेल, चेतन मोरे, ज्ञानेश्वर पाटील, जगन्नाथ देशमुख, सुयोग धारोकर यांनी प्रयत्न केले. त्यांना प्रा. एस. व्ही. मेनकुदळे, प्रा. एम. एम. फंड, प्रा. सुमित पवार, प्रा. जीवन गाडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी, प्राध्यापकांचे एमआयटी संस्थेचे अध्यक्ष डॉ. यज्ञवीर कवडे, महासंचालक मुनिष शर्मा, संचालक भूपेश मिर्शा, प्राचार्य डॉ. बी. बी. एकशिंगे यांनी अभिनंदन केले.

Next Article

Recommended