आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोंगरपायथ्याच्या वसाहती संकटात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरआणि नजीकचा परिसर डोंगररांगांनी वेढला आहे. डोंगरावरील झाडे नष्ट झाली असून ठिकठिकाणी खोदकाम झाल्यामुळे डोंगर गोलाकार निमुळते झाले आहेत. ते कधीही नागरी वसाहतींवर कोसळू शकतात. पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर "दिव्य मराठी'च्या प्रतिनिधीने शहरातील भूगर्भशास्त्रज्ञांसमवेत ठिकठिकाणची पाहणी केली. त्यात औरंगाबाद लेणी, सातारा गाव, गोगाबाबा टेकडीखालील परिसराला अधिक धोका असल्याचे निष्पन्न झाले.
थेट डोंगरांवर जाऊन शहर परिसरातील डोंगरांचा भूशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, शहरात पर्जन्यमान जास्त होत नाही, परंतु डोंगर पोखरल्यामुळे आणि एखाद्या वर्षी पावसाने सरासरी ओलांडल्यास माळीणसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सातारागावाला मोठा धोका
भूगर्भशास्त्रज्ञांसह सातारा गावात पोहोचल्यानंतर डोंगर साजरे दिसले; पण महाकाय डोंगराजवळ गेलो तेव्हा शहरातील माळीण दिसले. या डोंगराच्या अगदी पायथ्याशीच शेकडोे नवीन घरांची वसाहत होत आहे. खंडोबाचे मंदिर डोंगरापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर आहे; मात्र त्याच्याभोवती शेकडो घरे आणि नवीन गृहसंकुले होत आहेत. हा डोंगर मात्र पूर्णपणे धोकादायक कसा बनलाय याचा प्रत्यय तो चढून गेल्याशविाय येत नाही. ठिकठिकाणी दरडी कोसळत आहेत. मोठे दगड कोस‌ळून डोंगराच्या मध्यावर थांबले आहेत. त्याखालीच नवी गृहसंकुले होत आहेत. याचा धोका अद्याप कोणी ओळखलेला नाही.
हर्सूल, सावंगीवर भीतीचे सावट
शहराच्या चारही बाजूंनी बांधकामासाठी शासनाच्या परवानगीनेच खदानी सुरू असल्याने धोका संभवतो. हर्सूल, सावंगी येथे गावातच मोठी टेकडी पोखरल्याने तेथे वसाहतींना शाळेला धोका निर्माण झाला आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते पावसाळ्यात सर्वात मोठा धोका आहे तो औरंगाबादच्या लेणीला. तेथे सतत दरडी कोस‌ळून डोंगरमाथा निमुळता झालेला आहे. हनुमान टेकडी मात्र पूर्ण धोकादायक बनली आहे. यात डोंगराच्या वरचा भाग गोलाकार खाली खडकांची वेगाने झीज होत आहे. या टेकडीच्या पायथ्याच्या घरांना मोठा धोका असल्याचे भूूगर्भशास्त्रज्ञांनी सांगितले.
झाडे लावणे आवश्यक
डोंगरांवर मानवी हस्तक्षेप वाढल्याने धोका वाढला आहे. तेथील झाडे कापली जाऊ नयेत. शिवाय बांधकामे आणि खदानींना परवानगी देताना मानवी वसाहतींचा विचार व्हावा. झाडेच नष्ट झाल्याने डोंगरांवर तीव्र उतार झाले आहेत. तेच धोक्याचे आहे.
डॉ. अाशिष डोंगरे,भूगर्भशास्त्रज्ञ.
मुरूम, दगडांचे भाग कोसळू शकतात
भूपुरातत्वशास्त्रानुसार भुकंप, वादळ आदी नैसर्गिक कारणांमुळे दरडी कोसळणे, डोंगराचे सुळके पडणे ,नद्यांचे प्रवाह बदलणे हे घडल्याचे इतहिास सांगतो. सह्याद्री हा अभेद्य असूनही त्याचे सु‌ळके पडत आहेत याला कारण मानवी हस्तक्षेप आहे. मराठवाड्यातील डोंगर बेसाल्ट खडकापासून बनलेले असूनही यात मुरमाचा जास्त भाग आहे तसेच उन,वारा,पाऊस प्रदुषणाने येथील मोठे दगड सच्छीद्र झाल्याने ठिसूळ बनले आहेत. त्यामु‌ळे मुरम दगडांचे भाग कोस‌ळून खाली येऊ शकतात.
डॉ. महेश रा. सरोदे, पुरातत्वज्ञ
वस्त्या होऊ देऊ नये
शहरानजीकच्या डोंगरांचा दगड हा िठसूळ प्रकारचा असून माळीन सारखी पािरस्थीती आपल्या शहरात नक्कीच हो‌ऊ शकते. कारण सर्वच डोंगर बोडखे झाले आहेत. झाडांची बेसुमार कत्तल हेही एक कारण आहे. शहरातील बहुतांश डोंगरांवरचे मोठ मोठे दगड ढास‌ळण्याच्या स्थितीत आहे. पायथ्याशी वस्त्या होवू देणे जास्तीत जास्त झाडे लावणे हाच उपाय आहे.
-डॉ. दिलिप यार्दी, पर्यावरणतज्ज्ञ.
^डोंगररांगांचे मॅपिंग फार आवश्यक आहे. ते केले तर कोणत्या डोंगरांवर काय धोका आहे, ते कळण्यास मदत होईल. डोंगरापासूनच्या किमान ३०० मीटरपर्यंतच्या परिसरात घरे बांधण्यास परवानगी देऊ नये. डॉ.सतीश देशपांडे, भूगर्भशास्त्रज्ञ.
(धोके उपाय भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. सतीश देशपांडे, डॉ. आशिष डोंगरे प्रा. प्रफुल्ल शिंदे यांनी सुचवले आहेत.)
औरंगाबाद लेणी परिसरातील खडकांची तपासणी करताना भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. सतीश देशपांडे. छाया : अरुण तळेकर.

भूगर्भशास्त्रज्ञांनी केली दविस डोंगरांची तपासणी
उपाय काय?
डोंगरांवरभरपूर झाडे लावावीत.
उतारांवर संरक्षक िभंती बांधाव्यात.
डोंगरापासूनच्या किमान तीनशे मीटरचा परिसरात घरांना बांधकामाची परवानगी देऊ नये.
जेथे जास्त झीज होऊन पडझड झाली आहे, तेथे नेट लावून पडणारे दगड अडवता येतात.
काय आहेत धोके?
औरंगाबादलेणीच्या मागे पायथ्याशी डोंगर पोखरणे सुरू आहे. त्यामुळे लेणीलाच धोका आहे.
डोंगरांचे रेडबोल (खडकांचे थर) उघडे पडून झीज झाली आहे. लाव्हारसाच्या दोन थरांत मातीचा थर असतो. तो उघडा पडत आहे. माळीणच्या डोंगरावर हेच झाले आहे.
गोगाबाबा, हनुमान टेकडी, औरंगाबाद लेणीच्या डोंगरासह आजूबाजूच्या डोंगरावर तीव्र उतार धोक्याचा आहे.