आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकुंदवाड रेल्वेस्थानक कात टाकणार,दोन वर्षांत दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून विकासाची कामे केली जाणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर सर्व पॅसेंजर गाड्यांसह मराठवाडा एक्स्प्रेसही थांबते. आता या रेल्वेस्थानकाला डी दर्जा प्राप्त झाला आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाला यासंबंधी बोर्डाकडून पत्र प्राप्त झाले आहे. येत्या दोन वर्षांत या स्थानकाचा रेल्वे प्रशासनातर्फे कायापालट केला जाणार असून प्रवाशांना अनेक सेवा-सुविधा मिळतील.
सातारा, देवळाई, शिवाजीनगर, कामगार चौक, गारखेडा परिसर, जयभवानीनगर, सिडको, हडको, चिकलठाणा, शेंद्रा एमआयडीसी परिसरातील सहा ते सात लोकसंख्येच्या भागासाठी प्रथम मराठवाडा रेल्वे विकास समितीने श्रमदानातून मुकुंदवाडी रेल्वेस्थानक सुरू केले होते. त्याचे भूमिपूजन माजी खासदार मोरेश्वर सावे यांच्या हस्ते १९९६ मध्ये करण्यात आले, तर जानेवारी २००० ला समितीच्या वतीने खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार कै. शालिग्राम बसैये यांच्या उपस्थितीत स्थानकाचे उद््घाटन करण्यात आले. तेव्हापासून हजारो प्रवासी येथून चढ-उतर करतात.
दहा वर्षांत या परिसराचा मोठा विस्तार झाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली, पण रेल्वे प्रशासनाच्या अनास्थेमुळे स्थानक भकास राहिले.

सुविधांची वानवा

स्थानकावर ये-जा करण्यासाठी रस्ता नाही. शौचालय, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी खुर्च्या, कव्हरिंग शेडही नाही. सुरक्षेच्या दृष्टीनेही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. पोलिस चौकी आहे, परंतु ती नेहमीच बंद राहते.

या सुविधा त्वरित हव्यात
प्रवाशांच्या संख्येनुसार बसण्यासाठी बाकडे हवेत. कव्हरिंग शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, शौचालय उभारण्यात यावे. संतोषसोमाणी, अध्यक्ष,मराठवाडा रेल्वे प्रवासी सेना.