आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Commissioner Dr. Bhapkar

आयुक्त डॉ. भापकरांच्या कामगिरीवर दिलीप बंड झाले खुश !

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: रस्ता रुंदीकरणासाठी झटणारा अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या रूपाने शहराला भेटला. खूप छान वाटले. त्यांनी माझ्यापेक्षाही चांगले काम केले, अशा शब्दांत माजी आयुक्त दिलीप बंड यांनी डॉ. भापकर यांचे कौतुक केले आणि त्यांच्या या मोहिमेला 100 गुणही दिले. आपण त्यांना काही सल्ला दिला आहे. मात्र तो जाहीरपणे मी का सांगू, असा प्रश्न त्यांनी केला.
न्यायालयीन कामानिमित्त बंड सोमवारी शहरात आले होते. दुपारी दोन धडाकेबाजांची भेट झाली. बंड यांनी जेथे रुंदीकरण मोहिमेची शस्त्रे खाली ठेवली होती तो सिल्लेखाना, पैठण गेट, गुलमंडी, शहागंज, फाजलपुरा, चेलीपुरा, नॅशनल बुर्‍हाणी शाळा आदी ठिकाणे येथील रुंद झालेले रस्ते डॉ. भापकर यांनी दाखवले.
‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने बंड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मला खरोखरच खूप छान वाटले. माझ्यानंतर कोणीतरी भेटले आणि त्यांनी माझ्यापेक्षाही चांगले काम केले. माझे अपूर्ण राहिलेले काम करण्यासाठी कोणी धजावेल असे वाटले नव्हते. डॉ. भापकर हे एक चांगले अधिकारी आहेत, म्हणूनच त्यांना औरंगाबाद येथे आणण्यात आले होते. येथे काय चालते, याची मला जाणीव आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी धडाडीचे काम केले आहे. धार्मिक स्थळे पाडताना त्यांनी हीच धडाडी कायम ठेवावी, असेही त्यांनी म्हटले.
नाहीतर लोक शिव्या देतील
जे पाडले ते अत्यंत चांगले आहे; पण आता डॉ. भापकर यांनी तातडीने रस्त्यांची कामे हाती घ्यावीत, अन्यथा लोक शिव्या घालतील. शासनाकडून पैसे मिळतीलच; पण तरीही डांबरीकरण शक्य झाले नाही तर किमान डब्ल्यू. बी. एम.ची कामे करून ठेवावीत.