आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Commissioner Garbage Issue

कचरा फेकणार्‍यांना दररोज दंड; महापालिका आयुक्तांची निरीक्षकांना सक्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नागरिकांना कुंडीतच कचरा टाकण्याची सवय लागावी यासाठी महापालिकेने 2007 मध्ये दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे आता प्रत्येक स्वच्छता निरीक्षकाने दररोज किमान 2 हजार रुपये दंड वसूल करावा, असे आदेशच महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी जारी केले आहेत.
गुरुवारी बाहेरगावी रवाना होण्यापूर्वी डॉ. कांबळे यांनी हे कार्यालयीन आदेश जारी केले. या निर्णयावर उपमहापौर संजय जोशी यांनी टीका केली आहे. ‘आयुक्तांच्या या निर्णयामुळे नागरिकांना कुंडीत कचरा टाकण्याची सवय तर लागणार नाहीच, उलट स्वच्छता निरीक्षक इतर कामे सोडून हाती पावत्या घेऊन फिरतील. त्यामुळे साफसफाई कोलमडेल’, असे जोशी यांनी म्हटले आहे.
या गैरकृत्यांसाठी असेल दंड
>150 भाजीवाले, मासळीचा कचरा
>100 भंगारचा कचरा
>500 गुटख्याच्या रिकाम्या पुड्या टाकणे
>300 लहान हॉटेलचा कचरा
>25 उघड्यावर शौचाला बसणे
>25 उघड्यावर कचरा, घाण टाकणे
>50 दुभाजकात कचरा टाकणे
>100 फेरीवाल्यांनी कचरा टाकणे
>17 स्वच्छता निरीक्षकांची संख्या
>36 हजार त्यांच्याकडून दररोज अपेक्षित दंडाची रक्कम
कशासाठी होता दंडांचा निर्णय ?
16 ऑक्टोबर 2007 रोजी पालिकेने ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ या संकल्पनेतून उघड्यावर कचरा टाकणार्‍यांना दंड आकारण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दंड आकारणे अपेक्षित नव्हते, तर दंडाच्या भीतीपोटी नागरिकांना कुंडीत कचरा टाकण्याची सवय लागेल असे अभिप्रेत होते.