आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेची आरक्षण सोडत येत्या शनिवारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपा निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत येत्या शनिवारी काढली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता संत तुकाराम नाट्यगृहात ही सोडत काढण्यात येणार आहे. त्यात अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व महिला आरक्षणाची सोडत काढली जाईल. याशिवाय १० रोजी प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे. त्याच दिवसापासून आक्षेप, हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया १८ तारखेपर्यंत चालणार आहे. त्यासाठी मनपा आयुक्त, मनपाचा निवडणूक विभाग, प्रशासकीय इमारत टप्पा ३ व सर्व वॉर्ड अधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करता येतील. नागरिकांना सुनावणीची स्वतंत्र तारीख कळवली जाईल, असे आयोगाने म्हटले आहे.