आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Election Bogus Says MLA Jalil

आता प्रतिक्षा निकालाची: औरंगाबाद म‍हानगरपालिकेसाठी झाले 65 टक्के मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद महानगर पालिकेच्या 113 वॉर्डांसाठी आज (बुधवारी) मतदान झाले. आहे. मतदानाची वेळ संपली असून देखील शेकडो मतदार रांगेत उभे आहेत. रांगेत उभ्या असलेल्या मतदारांचे मतदान करून झाल्यानंतर मतदानाची प्रक्रिया बंद करण्‍यात येणार असल्याचे सूत्रांन‍ी सांगितले. महापालिकेसाठी 65% मतदान झाले आहे. एकूण 65 टक्के मतदान होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सर्वत्र शांततेत सुरु असलेल्या मतदानाला गणेश कॉलनी वार्डात गालबोट लागले तर शाई संपल्याने मुकुंदवाडीतील एका मतदान केंद्रात गोंधळ उडाला.

गणेश कॉलनी वार्डातील एका मतदान केंद्राबाहेर काही तरुणांनी दगडफेक केली. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे, मुकुंदवाडीतील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळील मतदार केंद्रात शाई संपल्याने गोंधळ उडाला. शेकडो मतदारांना केंद्राबाहेरच तात्कळत थांबावे लागले. मतदानाची वेळ संपल्याने शेकडो मतदारांना मतदारांना मतदानापासून वचिंत राहावे लागले.

दरम्यान, औरंगाबाद मध्यचे आमदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी दलित व मुस्लिम बहुल वार्डांमध्ये रात्रभर पैशांचा महापूर वाहात असल्याचा आरोप केला आहे. याकडे निवडणुक आयोगाने लक्ष्य देण्याची गरज आहे, अन्यथा लोकशाहीतील या महत्त्वाच्या कर्तव्यावरुन लोकांचा विश्वास उडेल असे ते म्हणाले. तर, शिवसेनेचे उपनेते आणि औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आमच्याकडे तर पैसेच नाहीत. आम्ही पैसे वाटत नाही. त्यांना पराभव दिसत असल्याने असे आरोप करत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, सकाळी 7.30 वाजता मतदानाला शांततेत आणि उत्साहत सुरुवात झाली. सकाळच्या कोवळ्या उन्हात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी गर्दी केल्याचे चित्र अनेक मतदान केंद्रावर पाहायला मिळाले. तरुण कार्यकर्ते वृद्धांना आधार देत मतदान केंद्रापर्यंत घेऊन येत होते. औरंगाबादच्या 113 वार्डांसाठी 907 उमेदवार रिंगणात आहेत.
खासदार खैरे, आमदार इम्तियाज जलील, माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बाजवला आणि मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा औरंगाबादच्या विविध मतदान केंद्रावरील दृष्य
सर्व छायाचित्र संदिप पारोळेकर.