आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वानखेडेनगरात नवा भिडू नवा "राज"

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वार्ड क्र. ५ः वानखेडेनगर वाॅर्डात दरवेळी नवीन उमेदवारांना संधी मिळते. एक अपवाद वगळता एकाही पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही. या वेळी भाजप आणि काँग्रेसला बंडखोर अपक्षांचे अाव्हान असल्याची चर्चा वॉर्डात रंगत आहे.
सध्या वॉर्डात सगळेच उमेदवार स्थानिक आहेत. यापूर्वी दरवेळी बाहेरून उमेदवारांची आयात करण्यात येत असे. १९९५ नंतर पुन्हा एकदा हा वॉर्ड सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्या वेळी शिवसेनेचे गणेश वानखेडे येथून नगरसेवक झाले होते. २००० च्या निवडणुकीत हा वॉर्ड ओबीसीसाठी राखीव होता. त्यात अपक्ष म्हणून इलियास किरमानी यांनी, तर २००५ मध्ये अपक्ष सेनेचे बंडखोर रविकांत गवळी यांनी विजय मिळवला होता. २०१० ला हा वॉर्ड अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होता. यात ज्योती रूपचंद वाघमारे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती. या वेळी पुन्हा अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे.
वॉर्डातील राजकारण
वॉर्डातभाजपकडून राज वानखेडे रिंगणात असून हिंदू अाणि नेहमीच्या संपर्कातील मतदारांवर त्यांची मदार आहे. भाजपचे आदित्य दराडे यांनी बंडखोरी केल्याने वानखेडेंची मते विभागली जाऊ शकतात. तसेच श्रीरंग फरकाडे सेनेशी संबंधित आहेत. काँग्रेसचे उमेदवार सचिन जाधव, एमआयएमचे आसिफ पटेल यांनाही सर्व शक्ती लावावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे रितेश यादव पाटीलदेखील स्थानिक उमेदवार आहेत.