आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Election News In Divya Marathi

बंडखोरांची थीम पक्षासारखीच, प्रचारासाठी रंगांपासून रुमालांपर्यंत पक्षाचीच काॅपी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी बंडखोरांना आवरण्याचे जाहीर कबूल केले असले तरी एकमेकांच्या वाॅर्डातील बंडखोरांना मदत करणे सुरूच ठेवले आहे. याशिवाय या बंडखोरांनीही जणू काही एकत्रति ठरवल्यासारखे आपल्या पक्षाची थीम वापरून प्रचार साहति्य तयार केल्याने ही बंडखोरी अधकिृत आहे का, असाच प्रश्न मतदारांना पडला आहे.

युती झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपला बंडखोरांनी नाकीनऊ आणले आहेत. सेनेच्या विरोधात सेनेचे, भाजपच्या विरोधात भाजपचे, सेनेच्या विरोधात भाजपचे व भाजपच्या विरोधात सेनेचे अशा चार वर्गांत हे बंडखोर विभागले गेले आहेत. सध्या तरी दोन्ही पक्ष आपापल्या वाॅर्डांत मति्रपक्षांच्या बंडखोरीने हैराण झाल्याचे चति्र समोर येत आहे. काल जरी शिवसेना व भाजपने एका बैठकीत बंडखोरांना आवरण्याच्या घोषणा केल्या असल्या तरी प्रत्यक्षात तसे होणे अवघड दिसत आहे.

पक्ष सांभाळून अपक्ष
यंदाच्या निवडणुकीत शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांच्या बंडखोरांचे एक समान वैशिष्ट्य पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे बंडखोर आपल्या पक्षाचे चिन्ह वगळता बाकी सगळी पक्षाचीच थीम वापरून प्रचार साहति्य, मंडप वगैरे तयार करीत आहेत. तीच गोष्ट भाजपच्या बंडखोरांनीही पाळली आहे. एवढेच नव्हे तर आपापल्या पक्षासारख्याच रंगांचे रुमाल गळ्यात घालून मतदारांना आपण मूळ कोण आहोत याची जाणीव करून दिली जात आहे. जणू काही एकमेकांशी चर्चा करून आपला मूळ पक्ष कोणता आहे हे मतदारांवर ठसवण्यासाठीच ही शक्कल लढवली जात असल्याचे काही उमेदवारांनी कबूलही केले.

सूत्रधारांचे मार्गदर्शन?
एका बड्या नेत्याने पुढील गणतिे पाहून मनपात कोणी मोठा भाऊ व्हायचे अथवा लहान हे आपण ठरवू या हेतूने निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांची मोट बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या असून त्याचाच एक भाग म्हणून चिन्हे वेगवेगळी असली तरी एकसूत्रीपणाने प्रचार कसा होईल याबाबत टिप्स दिल्याचे सूत्रांनी सांगतिले.