आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation: Hundred Crores Business Possible In Elections

महापालिका निवडणूक: शंभर कोटींच्या उलाढालीची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापालिका निवडणुकीत ११३ जागांसाठी सुमारे ८०० उमेदवार नशीब आजमावणार आहेत. निवडणुकीदरम्यान १०० कोटींचा खर्च होणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक आणि इव्हेंट कंपन्यांनी व्यक्त केला.

पक्ष कार्यकर्त्यांची जागा आता इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी घेतली आहे. परिचयपत्र तयार करण्यापासून पोल चिट वाटणे व सोशल मीडिया सांभाळण्यापर्यंत सगळी कामे या कंपन्या करत आहेत. शहरातील दोन आणि अहमदनगर, पुणे आणि मुंबई येथील प्रमुख नऊ कंपन्यांनी उमेदवारांच्या प्रचाराचे काम घेतले आहे. काही उमेदवार सहा महिन्यांपासून कामाला लागले आहेत. एका उमेदवाराचे पॅकेज चार लाखांपासून आठ लाखांपर्यंत आहे. शहरातील मोठ्या ६० उमेदवारांनी आपल्या प्रचाराची धुरा या कंपन्यांकडे दिली आहेे.

कसे असतात कंत्राट
उमेदवाराच्या प्रचारात नवनवीन फंडे वापरण्याचे काम या कंपन्या करतात. सेलिब्रिटी आणण्यापासून ते फेसबुक टि्वटर, व्हॉट्सअॅप, बल्क एसएमएस, व्हॉइस कॉलिंग अशा सर्व सुविधा पुरवतात. या पॅकेजमध्ये परिचयपत्र तयार करणे, सर्व्हे करून देणे, जाहीरनामा तयार करणे, पोलचिटचे वाटप करणे, रोड शो, कॉर्नर मीटिंग, वॉर रूम, लाइव्ह वोटिंग काउंट, मतदानाच्या वेळी बूथनिहाय रचना असे सर्वकाही पुरवले जाते. काही कंपन्या रॅलीसाठी कार्यकर्तेदेखील पुरवतात. एका महिला कार्यकर्त्याला सहाशे आणि पुरुष कार्यकर्त्याला पाचशे रुपये दिले जातात.

इलेक्शन सॉफ्टवेअर
या कंपन्यांनी उमेदवारांना इलेक्शन सॉफ्टवेअर पुरवले आहेत. यात प्रामुख्याने मतदार पाहण्याच्या सॉफ्टवेअरला मागणी आहे. वेगवेगळा सर्व्हे करून या कंपन्यांनी वाॅर्डनिहाय मतदारांचा डाटा बनवला आहे. यात मतदाराचे नाव टाकले की त्याचा पत्ता, मोबाइल नंबर, व्यवसाय शिवाय जात असा सगळा डाटा पाहायला मिळतो. आपल्या अँड्रॉइड मोबाइलवरदेखील हे सॉफ्टवेअर लोड करता येते. शिवाय वाॅर्डातील कामगार, व्यापारी, उद्योजक, महिला, तरुण असे वर्गीकरणदेखील या सॉफ्टवेअरद्वारे करता येते. सध्या जातीनिहाय वर्गीकरणावर उमेदवारांचा जोर असल्याचे पुढे आले आहे.

उमेदवारांचे काम सोपे होते
आम्ही काही उमेदवारांसाठी प्रचाराचे आणि सर्व्हेचे काम करत आहोत. अनेकांची निवडणूक लढवण्याची पहिली वेळ असल्यामुळे त्यांना सर्व्हे आणि डाटा लागतो. उमेदवारांचे काम सोपे व्हाचे हाच आमचा प्रयत्न आहे.
गणेश व्यवहारे
जॅक हेल्पलाइन.
पुढे वाचा... कुरेशी, गफ्फार कादरींच्या समर्थकांना उमेदवारी