आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद महापालिकेला बढती; विकासनिधी वाढणार, केंद्राच्या योजनांचा थेट लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या पाच वर्षांपासून ‘क ’वर्गात समावेशासाठी प्रतीक्षेत असलेल्या औरंगाबाद मनपाला बाप्पा पावले. सोमवारपासून औरंगाबाद महापालिकेला ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात बढती देण्यात आली. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या योजनांतून सध्यापेक्षा दुप्पट निधी मिळवता येईल तसेच शहराचा कारभार सक्षमपणे हाकण्यासाठी जादा पदेही मिळणार आहेत.

शासनाने २००१ च्या जनगणनेनुसार २२ मनपांचे वर्गीकरण केले होते. त्यानंतर आता २०११ च्या जनगणनेनुसार नव्याने वर्गीकरण केले. लोकसंख्या, दरडोई उत्पन्न व दरडोई क्षेत्रफळ या निकषांवर हे वर्गीकरण केल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. या निकषानुसार नागपूर मनपाची लोकसंख्या ही अ वर्ग मनपाच्या निकषांजवळ आहे, परंतु दरडोई उत्पन्नाचा निकष पूर्ण करीत नाही. तरीही नागपूरच्या मनपाला विशेष बाब म्हणून अ वर्ग देण्यात आला. नाशिक मनपाची लोकसंख्या ब वर्गाच्या निकषांच्या जवळपास आहे. दरडोई उत्पन्नाचा निकष पूर्ण केल्याने नाशिक महानगरपालिकेचे विशेष बाब म्हणून ब वर्ग करण्यात आले.

सात वर्षांनंतर यश : मनपाचा ड वर्गातून क वर्गात समावेश करावा यासाठी २००७ पासून प्रयत्न सुरू होते. शिवाय नगरसेवक मधुकर सावंत यांनी एक याचिकाही खंडपीठात दाखल केली होती. सात वर्षांनंतर या प्रयत्नांना यश मिळाले असून शहराच्या विकासाला आता चालना मिळणार आहे. अ वर्गात केवळ २ मनपा : राज्यातील मुंबई ही एकमेव मनपा अ+ वर्गात आहे. पुणे व नागपूर मनपा या केवळ दोन मनपा अ वर्गात आहेत. पिंपरी -िचंचवड, ठाणे, नाशिक या मनपा ब वर्गात आहेत. कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, वसई -विरार, नवी मुंबई या महानगरपालिका क वर्गात आहेत. उर्वरित सर्व महानगरपालिका या ड वर्गात आहेत.

उत्पन्नाचे स्रोत वाढणार
{ राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजनांतून अनेक योजनांतून मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो.
{ शहरांत नागरी सुविधा देण्यासाठी
केंद्र सरकारच्या विविध योजना थेट लागू होतील.
{ काही विशिष्ट योजनांत मनपाला आपला आर्थिक वाटा उचलावा लागण्याची गरज नाही. या योजनांचे योग्य प्रस्ताव सरकारकडे पाठवले तर १०० टक्के निधी सरकारकडून उपलब्ध होतो.
{ ड वर्ग महापालिकेला कर वाढवताना अनेक अडचणी येतात. पण आता वर्ग बदलल्याने मनपा मालमत्ता करात
वाढ करू शकते. त्यातून मनपाचे उत्पन्न वाढू शकते.
एलबीटी अथवा जकात क वर्ग महापालिकेला रद्द करता येणार नाही.
मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, उपअभियंत्यासह अतिक्रमण, बांधकाम, सफाई, आरोग्य आदी विभागांत तृतीय, चतुर्थश्रेणीची पदे भरता येतील.
नागरिकांना थेट फायदा
महापालिका क वर्गात आल्याचा थेट फायदा नागरिकांना होईल. सध्याच्या निधीत दुपटीने वाढ होऊ शकते.
- डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त

आता निधीची अडचण नाही
क वर्गासाठी प्रयत्न केले. यामुळे आता केंद्र व राज्य सरकारकडून अधिकचा निधी मिळवताना अडचण येणार नाही.
कला ओझा, महापौर

पुढील स्लाइडमध्ये, कांबळेंची बदली; महाजन नवे आयुक्त