आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुटलेले दुभाजकांचे कठडे, जागोजागी असलेले उघडे चेंबर आणि भररस्त्यावर असणार्या तुटलेल्या झाडांचे बुंधे याबाबत तत्काळ कारवाई करा. शहरातील सर्व दुभाजकांची दुरुस्ती करा, बुंधे भुईसपाट करा आणि एकही चेंबर उघडे दिसता कामा नये.. असे स्पष्ट आदेश मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी अधिकारी व कर्मचार्यांना दिले. डीबी स्टारने या सर्व प्रमुख समस्यांना विविध वृत्तांतून वाचा फोडत अभियानच राबवले. त्यानंतर आयुक्तांनी खास बैठक घेऊन वरील कडक सूचना केल्या.
शहरातील सर्वच प्रमुख समस्या सोडवण्यासाठी डीबी स्टारने वारंवार विविध वृत्ते प्रकाशित करून वाचा फोडली. त्यातून वृक्षतोडीचा विषय ऐरणीवर आला. पर्यावरण संवर्धनासाठी दोन फोरमही स्थापन झाले. स्वच्छता असो की वृक्षतोड असो, पाणीबचत असो की जलवाहिनीची समस्या असो, रस्ते असो की कचर्याचा विषय असो; या सर्वच प्रश्नांना वाचा फोडली. त्यापाठोपाठ वृक्षतोडीनंतर ठेवलेले बुंधे आणि उघडे ढापे यासंदर्भात वृत्तमालिका प्रसिद्ध केली. त्यानंतर आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी अधिकार्यांची बैठक घेतली. त्यात शहरात एकही दुभाजक नादुरुस्त असू नये, चेंबर उघडे दिसता कामा नये, तसेच कापलेल्या झाडांचे बुंधे काढून रस्ते चांगले करा, असे आदेश त्यांनी दिले. प्रश्नाबाबत तत्काळ समस्या निकाली काढा व तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
यांना दिले आदेश
डॉ. भापकर यांनी शहर अभियंता एम. डी. सोनवणे यांना या प्रकरणी तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले, तसेच उद्यान अधीक्षक विजय पाटील यांना सार्वजनिक बांधकाम खात्याला तत्काळ तुटलेल्या दुभाजकांचे कठडे दुरुस्त करण्याबाबत पत्र देण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.