आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगाल महानगरपालिकेत दिन दिन दिवाळी. वरिष्ठ अधिकारी गैरहजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

"एकीकडे वीज बिलाची थकबाकी आणि समांतर जलवाहिनीसाठी 94 कोटी रुपये भरता यावेत यासाठी महापालिकेने आपल्या 25 महत्त्वाच्या मालमत्ता बँकेकडे तारण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विकासकामांसाठी निधी नसल्याची ओरड सुरू आहे. मात्र, दुसरीकडे कार्यालयात खुलेआम विजेची उधळपट्टी करत ‘दिवे’ लावण्याचे काम वरिष्ठ अधिकारी करत आहेत. विशेष म्हणजे कार्यालयात कुणीच हजर नसताना जवळपास सर्वच अधिकार्‍यांच्या दालनातील दिवे दिवसाढवळ्या प्रकाश पाडत आहेत. ‘जनतेचा पैसा, मला त्याचे काय?’ या मानसिकतेमधूनच असे प्रकार घडतात. दीन पालिकेची ही दिवाळी शहरवासीयांना परवडणारी नाही."

प्रशासकीय अधिकारी प्रियंका केसरकर, सहा. नगररचनाकार डी. पी. कुलकर्णी, उपअभियंता वसंत निकम, उपअभियंता ए. बी. देशमुख, मालमत्ता अधिकारी एस. पी. खन्ना, कार्यकारी अभियंता सखाराम पानझडे, शहर अभियंता एम. डी. सोनवणे, सय्यद सिकंदर अली, सहा. नगररचनाकार अ. कृ. लखपती, विशेष भूसंपादन अधिकारी सु. प. कांबळे, विद्युत अभियंता परमेश्वर बनसोडे, विद्युत अभियंता मो. शाकेर, विद्युत अभियंता आर. एस. बनकर, मुख्य अग्निशमन अधिकारी तथा उपायुक्त शिवाजी झनझन, जायकवाडी पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता यू. सी. शिरसाट, बीओटी कक्षप्रमुख एस. डी. काकडे, बांधकाम विभागातील प्र. उपअभियंता अफसर सिद्दिकी यांनी कार्यालयात नसताना भिंतीवर प्रकाश पाडला. याशिवाय नगररचना विभाग, प्रभाग अधिकारी, रोखपाल कक्ष, वॉर्ड अ कार्यालय, माहिती अधिकारी या कार्यालयांतही वेगळी परिस्थिती नव्हती.

अधिकारी गायब
कार्यालयीन वेळेत मनपातील अधिकारी कधीही जागेवर भेटत नाहीत. कारभार शिस्तीत चालावा आणि अधिकार्‍यांना आपली कार्यालयीन व साइटवरील कामे करता यावीत म्हणूनच जनतेच्या भेटीसाठी दुपारची 3 ते 5 ही वेळ ठेवलेली आहे; परंतु या वेळेत कुठलाही अधिकारी दालनात भेटत नाही. त्याबाबत रोज शेकडो तक्रारी डीबी स्टारकडे येतात. चमूने स्वत: मनपात जाऊन याचा अनुभव घेतला. बुधवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत मनपातील एकही अधिकारी जागेवर नव्हता. मात्र, त्यांच्या दालनात विजेची उधळपट्टी सुरूच होती. रिकाम्या खुच्र्या आणि टेबलांना प्रकाश देत दिवे तासन्तास तसेच सुरू होते. त्यांच्या दालनाबाहेर मात्र लोक तासन्तास त्यांची वाट पाहत ताटकळत होते.

अधिकारी बाहेर पडताना मुव्हमेंट रजिस्टरमध्ये नोंद नसेल तर त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. या चुकीच्या पद्धतीवर अंकुश लावणार. एकाच वेळी सर्व अधिकारी बाहेर पडत असतील तर त्यावरही निर्णय घेतला जाईल. कार्यालयातून बाहेर पडताना अधिकारी व कर्मचार्‍यांनी दिवे, पंखे बंद करावेत. यासाठी परिपत्रकच काढले जाईल.
- रवींद्र निकम, उपआयुक्त, मनपा.