आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपत्ती करवाढीच्या दिशेने आयुक्तांचे पहिले पाऊल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी पहिले पाऊल उचलले आहे. त्यानुसार मंगळवारी (11 जून) 16 हजार व्यापारी प्रतिष्ठानांना मालमत्ता कराच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

यापूर्वी मनपातर्फे करवसुली जानेवारी ते मार्चदरम्यान केली जात होती. त्या वेळी चुकीने अधिक कर आकारणी केली जात असे, शिवाय एकाच वेळी अनेकांना नोटिसा मिळाल्यामुळे कर भरण्यासाठी मोठय़ा रांगा लागायच्या. या त्रासाला कंटाळून अनेक जण कर भरण्यास टाळाटाळ करत होते. परिणामी कराची प्रभावी वसुली करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे ही अडचण लक्षात घेऊन डॉ. कांबळे यांनी यंदा एप्रिल महिन्यापासूनच करवसुली करण्यासाठी कक्ष स्थापन केले आहे. त्यानुसार 16 हजार मालमत्ताधारकांना नोटिसा पाठवून कर भरण्याचे सूचित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शंभर टक्के करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य होईल. तसेच मनपाला उत्पन्न मिळाले तर विकासकामांना चालना मिळण्यास फायदा होणार आहे.