आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचारसंहितेची हूल देऊन ४१ कोटींच्या कामांना मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आचारसंहिता लागणार असल्याची हूल देत दुपारी ३ वाजेची बैठक १५ मिनिटे आधीच सुरू करून ४१ कोटी रुपयांच्या कामांना चर्चेविनाच मंजुरी देण्याचा प्रकार महापालिकेच्या स्थायी समितीच्या बाबतीत मंगळवारी झाला. उपायुक्त रवींद्र निकम यांनी दिलेली आचारसंहिता लागणार असल्याची बातमी खोटी असल्याचे बैठक संपल्यानंतर स्पष्ट झाले.

मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीला पहिल्यापासूनच अडथळे येत गेले. एलईडी आिण कत्तलखान्याच्या निविदांच्या घोळात शुक्रवारी स्थायी समितीची बैठक सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. सोमवारीही या निविदांचे काहीच न झाल्याने अाजचा मुहूर्त ठेवण्यात आला होता. आजच्या बैठकीत विषयपत्रिकेतील ६ आिण ऐनवेळचे तीन असे नऊ िवषय होते. दुपारी तीन वाजेची बैठक २ वाज्ून ४५ मिनिटांनी सुरू झाली आिण १५ मिनिटांत संपलीदेखील.

आचारसंिहतेचा धसका
आज दुपारी पावणेतीन वाजता उपायुक्त रवींद्र निकम यांना "निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ३ वाजता' असा एक एसएमएस आला. त्यांनी लगेच सभापतींना फोन करून आचारसंिहता लागणार असल्याचे सांगत बैठक उरकून घेण्याची सूचना केली. त्यानुसार बैठक सुरू झाली. किरकोळ चर्चा करत लगोलग सगळे विषय मंजूर करत राष्ट्रगीताचा पुकारा झाला आणि बैठक संपवण्यात आली. सारे सदस्य सभापतींच्या दालनात आल्यावर आचारसंहिता लागू झाली नसल्याचे समजले. त्या वेळी मात्र स्थायी समितीच्या सर्व सदस्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.
कत्तलखान्याच्या निविदेला मान्यता
पडेगावात केंद्र सरकारच्या सहकार्याने अत्याधुनिक कत्तलखाना उभारला जाणार आहे. ३६ कोटी ५० लाख रुपयांच्या या प्रकल्पासाठी अल कुरेश एक्स्पोर्ट््स-जावेद फतेह महंमद चौधरी या कंपनीला काम देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. केंद्राचे कोणतेही अनुदान न घेता मनपाला २.६० कोटी रुपये हाच ठेकेदार देणार आहे. त्यात दर तीन वर्षांनी वाढ होणार असल्याने या ठेकेदाराची निवड केली आहे.
काय असेल कत्तलखान्यात?
पडेगावात आधुनिक कत्तलखाना उभारण्यात येणार असून यंत्राद्वारे व हाताने असे कत्तलींचे दोनविभाग तयार करण्यात येणार आहेत.शिवाय शीतगृह, जनावरे ठेवण्यासाठी बंदिस्त जागा आदी सुिवधा तेथे असणार आहेत.
सलीम अली सरोवराचे शुल्क आता २० रुपये
आजच्या बैठकीत सलीम अली सरोवराचे शुल्क १० रुपयांवरून ३० रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला काशीनाथ कोकाटे आिण मीर हिदायत अली यांनी विरोध केला. शुल्क वाढवू नये, असे त्यांचे स्पष्ट मत होते, तर त्र्यंबक तुपे यांनीही एवढी वाढ करणे चुकीचे असल्याचे सांगितले. त्यावर अखेर सर्वानुमते ३० ऐवजी २० रुपये शुल्क करण्याचा व अपंग-शालेय विद्यार्थ्यांना सवलत देण्याचे जाहीर करत सभापतीविजय वाघचौरे यांनी सुधारणेसह हा प्रस्ताव मंजूर केला.
मुक्तिसंग्राम स्मारकाची निविदा
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकाच्या अंतर्गत व बाह्य सजावटीच्या पाच कोटी रुपयांच्या कामासाठी मुंबईच्या ग्रािफक इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. ४ कोटी ७८ लाख ६१ हजार ५०० रुपयांची ही निविदा असून त्यावर कसलीही चर्चा न होता ९.९९ टक्के जादा दराने असलेली ग्रािफक इन्फ्रास्ट्रक्चरची निविदा मंजूर करीत असल्याचा ठराव सभागृहाने मंजूर केला.