आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल्‍डरची नुसती आश्वासने; रहिवासी सुविधांपासून वंचित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बीड बायपास रोड येथील प्रीझम अपार्टमेंट उभारून तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. श्रीराम कन्स्ट्रक्शनने बांधलेल्या या अपार्टमेंटमध्ये ८३ घरे बांधण्यात आलेली आहे. प्लॅट विक्री करताना बिल्‍डरने मोठी आश्वासने दिली. महानगरपालिकेचे पाणी मिळणार असल्याचे सांगून प्रत्येकी २५ हजार रुपये मालमत्ताधारकांकडून घेतले. त्यानंतर विद्युत मीटरसाठी १५ हजार घेतले. मात्र, तीन वर्षे उलटूनही रहिवाशांना सुविधा दिल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अपार्टमेंटला महानगरपालिकेचे पाणी अद्यापही मिळालेले नसून विहिरीवर अवलंबून राहावे लागत आहे. पिण्‍यासह इतर वापरासाठी विहिरीचे पाणी पुरत नाही. वॉचमनसाठी बांधण्यात आलेले शौचालयाचे काम अर्धवट सोडवण्यात आले आहे. रहिवाशांसाठी बनविण्यात आलेली जिमच्या छतावरील पाणी जाण्यासाठी वाट काढण्यात आलेली नाही. यामुळे जिमचे छत पडले आहे. अग्निशमन यंत्रणा नादुरुस्त झालेली आहे, अशा समस्यांनी वेढलेल्या प्रीझम अपार्टमेंटमधील रहिवाशांना न्याय मिळण्याची मागणी पंकज लोया, विनायक देशपांडे, दीपक करवा, राजीव इंदूरकर, लक्ष्मीनारायण कामत, स्वप्निल केंद्रे, नवनीत श्रीवास्तव, पुष्पा लोया, विठ्ठल बोंद्रे आदी नागरिकांनी केली.
सुविधा देण्यात येतील
अपार्टमेंटला व्हिनस सोसायटीतून मनपाचे पाणी देत आहे. समांतर योजनेमुळे नवीन कनेक्शनची परवानगी मिळत नाही. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. काही सुविधा देण्यासाठी आम्ही चुकलो असून त्या तत्काळ पूर्ण करण्यात येईल. आशुतोष नावंदर, बिल्‍डर्स

दिव्य मराठी हेल्पलाइन
तुमच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमच्या प्रतिनिधींना ९७६५०७०३३३, ९०२८०४५१९९ या मोबाइल क्रमांकांवर समस्या कळवा.