आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटननगरी कचरामुक्त कधी होणार, रस्ते कधी सुधारणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पर्यटननगरी कचरामुक्त कधी होणार, रस्त्यांवरील खड्डे कधी बुजवणार, समांतरमुळे पडलेली भर आणि नेहरू भवनातील जागेवर कब्जा करून बसलेल्या माणसाला बाहेर कधी काढणार, असे संतप्त सवाल करत आज नगरसेवकांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरले. डीबी स्टारमध्ये आलेल्या वृत्तांचा लेखाजोखाच वाचून दाखवत नगरसेवक आजच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक झाले होते.

पर्यटननगरी असलेल्या औरंगाबाद शहरातील सर्वच मूलभूत समस्यांवर डीबी स्टारने कायम कोरडे ओढले आहेत. कचरा, खड्डे, पार्किंग, अतिक्रमणाचा प्रश्न असो की स्वच्छतेचा प्रश्न, डीबी स्टारने सातत्याने या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. त्यासाठी वेळोवेळी विविध अभियानेही राबवली. त्यावर शहरभरात मंथन झाले आणि होत आहे. अलीकडेच खड्ड्यांच्या प्रश्नांवर डीबी स्टारने खास मालिकाच प्रसिद्ध केली. ज्येष्ठांपासून ते महिलांपर्यंत आणि वाहनधारकांपासून ते गर्भवती महिलांपर्यंत सर्वांना होणारा त्रास मांडून या वृत्तांद्वारे डीबी स्टारने प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. या वृत्तांचाच आधार घेत महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांनी डीबी स्टारचे विविध अंक सभागृहात झळकवत आयुक्त, अधिकारी, महापौर, उपमहापौर व अन्य अधिकाऱ्यांना कडक शब्दांत जाब विचारला.
काय म्हणतात नगरसेवक
नेहरू भवनाप्रमाणेच शहरात मनपाच्या अनेक खुल्या जागा आहेत. त्यावरही अतिक्रमण होऊ शकते. डीबी स्टारने नेहरू भवनाचा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला जागे केले. आता तरी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी.
सत्यभामा शिंदे, नगरसेविका
एकाकडे गेले की तो दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पाठवतो. एकमेकांकडे टोलवाटोलवी करणाऱ्या या अधिकाऱ्यांमुळे आमची कामे होत नाहीत. त्यामुळे डीबी स्टारकडे धाव घ्यावी लागते. त्यात वृत्त प्रसिद्ध होताच अधिकारी सुतासारखे सरळ होतात.
मोहन मेघावाले, नगरसेवक

टीव्ही सेंटर ते लेबर कॉलनी, अण्णाभाऊ साठे चौक ते उद्धवराव पाटील चौक रोड तसेच चिश्तिया कॉलनी ते बळीराम पाटील चौक या रस्त्यांची माती झाली आहे. कामे मंजूर होऊनही अधिकारी रस्ते दुरुस्त करत नाहीत.
-महेश माळवदकर