आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Jawahar Nagar School Poisoning Case

औरंगाबाद मनपाच्या शाळेत खिचडीतून 24विद्यार्थ्यांना विषबाधा, \'इस्कॉन\'कडून होतो पुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चिलटांच्या बंदोबस्तासाठी पालिकेच्या वतीने नुकतीच हाती घेण्यात आलेली धूर फवारणी मोहीम पालिकेच्याच जवाहरनगर शाळेतील 24 विद्यार्थ्यांच्या जिवावर उठली. मध्यंतरात शाळेसमोर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांसमोरूनच धूर सोडत वाहन गेल्याने याची बाधा विद्यार्थ्यांना झाली. सर्वांना घाटीत दाखल करण्यात आले. बाधा झालेल्यांमध्ये र्शी बाबासाई एड्सग्रस्त मुलामुलींच्या वसतिगृहातील 14 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
घटनेपूर्वी विद्यार्थ्यांनी इस्कॉनची खिचडी खाल्ली होती. त्याचेही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. शाळेतील सर्व 139 विद्यार्थ्यांनी ही खिचडी खाल्ली. मात्र फवारणीदरम्यान मुख्य रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मुलांनाच बाधा झाली. दरम्यान, मुलांच्या उलट्यांचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवल्याचे घाटीतील वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एल. गट्टाणी यांनी सांगितले. तर मोठय़ा रस्त्यांवर फवारणी करण्याचे ठरले होते. मात्र, ती शाळेसमोरच करण्यात आल्याने हा प्रकार घडला असावा, असे उपमहापौर संजय जोशी म्हणाले. एड्सग्रस्त विद्यार्थ्यांमध्ये प्रतिकारशक्ती नसल्याने त्यांना धोका जास्त असल्याचे र्शी बाबासाई एड्सग्रस्त मुला-मुलींच्या वसतिगृहाचे अधीक्षक मनोज वाकुडे यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी एम. एम. शेख, आरोग्याधिकारी डॉ. मनीषा भोंडवे, इस्कॉनचे पोटभरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. महापौर कला ओझा, आयुक्त डॉ. कांबळे, आमदार प्रदीप जैस्वाल, नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, महेश माळवतकर, गजानन बारवाल यांनी घाटीत विद्यार्थ्यांची विचारपूस केली. दरम्यान, दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइडमध्ये, खिचडीमुळे अशक्य..