आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौरांनी केली साडेचार कोटींची कामे रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी मंजूर करण्यात आलेला साडेचार कोटींचा प्रस्ताव महापौर कला ओझा यांनी रद्द केला. दबावाखाली महापौरांनी हा निर्णय घेतल्यामुळे मनपाच्या वतरुळात एकच चर्चा होती.

शहर रस्ते विकास योजनांतर्गत उस्मानपुरा गुरुद्वारा ते पीरबाजार आणि एसएससी बोर्ड ते पीरबाजार रस्त्याचे डांबरीकरणासाठी साडेचार कोटींचा प्रस्ताव नुकत्याच सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता.

मात्र, शहरातील विविध रस्त्यांची कामे अर्धवट असून नवीन कामांना मंजुरी देणे योग्य नाही म्हणून प्रस्ताव रद्द करण्यात आला असे स्पष्टीकरण महापौरांनी पत्रकारांशी बोलताना केले.

लवकरच चौकशी
नगररचना विभागातील अनागोंदी कारभाराची पुणे नगररचना सहायक संचालकामार्फत चौकशी व्हावी. चौकशी होईपर्यंत सहायक संचालक डी. पी. कुलकर्णी यांना पदावरून हटवण्यात यावे. या घेतलेल्या निर्णयावर महापौर ठाम आहेत. याबाबत त्यांनी गुरुवार 14 फेब्रुवारी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना विचारणा केली असता त्यांनी लवकरच चौकशी होईल असे सांगितले.

समन्वयाचा अभाव
सर्वसाधारण सभेत विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे महापौरांनी डी. पी. कुलकर्णी यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घाईत घेतला आहे. या निर्णयावर वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात येणार असल्याचे राजू वैद्य यांनी सांगितले. मात्र, महापौर आपल्या निर्णयावर ठाम आहेत. तेव्हा सत्ताधारी पक्षातील पदाधिकार्‍यांमध्ये समन्वयाचा अभाव आणि अंतर्गत कलह असल्याचे या निमित्ताने सिद्ध होते.