आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्षानंतर आता दबावतंत्र; ‘महापौर हटाव’साठी काही नगरसेवक सक्रिय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ठरावीक नेत्यांच्या म्हणजेच शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या बैठकांना परवानगीशिवाय हजेरी लावण्यास मनाई करा, अशी जाहीरपणे मागणी करणार्‍या महापौरांना पदावरून दूर करावे, असा रेटा काही नगरसेवकांकडून सुरू झाला आहे. मात्र, याला खैरेच राजी होणार नसल्यामुळे हे केवळ दबावतंत्र असल्याचेच स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे महापौरांच्या पत्रामुळे निर्माण झालेल्या पेचाबाबतची तक्रार ‘मातोर्शी’पर्यंत पोहोचती झाली आहे. दरम्यान, शिवसेना उपनेते रामदास कदम यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यानिमित्त शिवसेनेचे स्थानिक आमदार, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख तसेच अन्य काही पदाधिकारी सायंकाळी मुंबईला गेले असून वेळात वेळ काढून यातील काही जण ‘मातोर्शी’वर याप्रकरणी चर्चा करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सध्या खासगीत सुरू असलेली चर्चा अधिकृत होणार की निवडणुकीच्या खर्चावरून हा प्रकार थांबणार, हे नंतर स्पष्ट होणार आहे. महापौर कला ओझा व सभागृह नेते सुशील खेडकर यांनी मंगळवारी आयुक्तांना दिलेले पत्र म्हणजे संघटनेच्या जिवावर पदाधिकारी झालेल्या महापौरांनी संघटनेवर केलेला प्रहार असून, उर्वरित पान.8
हटवण्याची मागणी नाही
पक्षाच्या नेत्याने बैठक बोलावली तर अधिकारी जाणारच. कारण नेते पक्षासाठी काम करतात. महापौरांना पदावरून हटवा, अशी मागणी आली नाही. यापुढे असा प्रकार घडू नये, असे महापौरांना सांगण्याची गरज नाही. साहेबांच्या कानी घालण्यासारखा हा विषय नाही.
-अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख.