आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Meeting Hall Damage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

66 सभागृहांचा झाला उकिरडा; मनपाच्या अब्जावधी रुपयांच्या मालमत्तेचा कचरा..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक आरोग्य निकोप राहावे, प्रत्येकाचा सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक विकास व्हावा तसेच सहजीवनाचा आनंद लुटता यावा, या उदात्त हेतूने महानगरपालिकेने साधारण 15 वर्षांपूर्वी शहरभर 66 सामाजिक सभागृहे उभारली. त्यात समाज मंदिर, सभागृहे, वाचनालये, बहुउद्देशीय हॉल, सांस्कृतिक केंद्र, व्यायामशाळांचा समावेश आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च झाला. मात्र त्याचे रूपांतर पडक्या इमारतींमध्ये झाले आहे.
बांधल्यापासून उपयोगच घेतला नाही
ठिकठिकाणी या वास्तूंचा बांधल्यापासून उपयोगच घेतला गेला नाही. उजाड झालेल्या या परिसरात कचरा साठला असून मोकाट जनावरांना चरण्याचे कुरण, दारुडे आणि जुगार्‍यांचा येथे वावर असतो. काही खोल्यांचा लोकांनी शौचालय म्हणून उपयोग सुरू केला आहे.
डीबी स्टारची पाहणी
कोहिनूर कॉलनी, गरमपाणी, जसवंतपुरा, रवींद्रनगर, शाहबाजार, नागसेन कॉलनी, रोजेबाग, कटकट गेट, हसरूल, बापूनगर, सिद्धार्थनगर, गारखेडा, शताब्दीनगर, एकनाथनगर, पन्नालालनगर, बेगमपुरा, मोतीकारंजा, जाफरनगर, किराडपुरा, जयनगर, इंदिरानगर, बायजीपुरा, चिकलठाणा, नारेगाव, रेल्वेस्टेशन, सिडको एन-6, रामनगर, आंबेडकरनगर, ब्रिजवाडी, अल्तमश कॉलनी, शिवनेरी कॉलनी, पवननगर, र्शीनिकेतन कॉलनी व अन्य काही परिसरात ही समाज मंदिरे आहेत. या सर्व सभागृहांची डीबी स्टार चमूने पाहणी केली. या सर्वच इमारतींच्या अनेक समस्या आहेत. त्या त्या परिसरातील अनेक नागरिकांनीही अडचणींचा पाढा वाचला. सर्व सोयींनी युक्त अशी एकही इमारत शहरात नाही.
अवस्था आणि समस्या
नारेगावच्या सामाजिक सभागृहाच्या पाठीमागे तर चक्क अतिक्रमण करून एक खोली बांधण्यात आली आहे. ज्याचे कुणाचे बांधकाम निघाले तो या बिनभाड्याच्या खोलीत आर्शय घेतो, तर ब्रिजवाडीच्या वाचनालयाची दारे- खिडक्या, विद्युत उपकरणे गायब झाली आहेत. चिकलठाण्याच्या सामाजिक सभागृहाच्या तळघराचे तर चक्क सार्वजनिक स्वच्छतागृह झाले आहे. शिवाय लोक कचराकुंडी म्हणूनही या सभागृहाचा वापर करत आहेत.
मालमत्ता गायब झाली
बहुतांश सभागृहाची दारे, खिडक्या, विद्युत उपकरणे, लोखंडी शटर गायब झाली आहेत. कोटला कॉलनीच्या वाचनालयाचीही हीच अवस्था झाली आहे. फरशांवर तर घाणीचे आणि धुळीचे थरच्या थर जमा झाले आहेत. अनेक इमारतींची पडझडही झाली आहे. काही ठिकाणी तर या बकाल आणि निर्मनुष्य झालेल्या इमारतींच्या आत आणि बाहेर तळीराम आणि जुगार्‍यांची मैफल रंगते.
दुरुस्तीचे आदेश देणार
> सर्वच सभागृहांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मालमत्ता अधिकारी व वॉर्ड अधिकार्‍यांना आदेश दिले जातील. याशिवाय त्या त्या भागातील नागरिकांना ही सभागृहे भाड्याने देण्याच्या प्रस्तावावरही विचार केला जाईल.
-अनिता घोडेले, महापौर
लवकरच दुरुस्ती करणार
> या सर्व इमारतींची दुरुस्ती करून त्या शहरातील कलावंत, स्थानिक नागरिक किंवा इतर सेवाभावी संस्थांना भाड्याने देण्याचा निर्णय एका बैठकीत झाला आहे. यातील 16 इमारती दिल्याही. तेथे उपक्रम चालू आहेत. आता लोकांनीही तक्रारी न करता सहकार्य करावे.
- प्रशांत देसरडा, उपमहापौर