आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महानगरपालिकेत पक्षाला एकही अपक्ष सदस्य जोडता आला नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत २२ जागा पटकावल्या. मात्र, पुढे आघाडी करण्यात ते पिछाडीवर राहिले. त्यामुळे पालिकेत अन्य सर्व सदस्यांच्या तीन आघाड्या भाजप मात्र एकटाच पक्ष असे चित्र समोर आले. शनिवारच्या सर्वसाधारण सभेत तीन आघाड्यांना मंजुरी देण्यात आली. शिवसेना, एमआयएम काँग्रेसने अपक्षांच्या मदतीने आघाड्या स्थापन केल्या; पण भाजपला तसे काहीही करता आले नाही. पालिकेत यश, पण पुढच्या राजकारणात अपयश असे याचे वर्णन त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी केले.
शिवसेनेचे २८ सदस्य विजयी झाले. त्यांनी अन्य अपक्षांना सोबतीला घेत ४१ सदस्यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी गठीत केली. एमआयएमचे अधिकृत २२ सदस्य निवडून आले होते. त्यांनी २६ सदस्यांची आघाडी केली. काँग्रेसचे १० सदस्य विजयी झाले. त्यांच्यातील काही जण फुटले खरे, पण त्यांनी राष्ट्रवादीचा एक सदस्य तसेच अपक्षांना सोबत घेत १० जणांची आघाडी स्थापन केली. भाजपलाही यात संधी होती. मात्र, ते काहीही करू शकले नाही.
भाजपने ३१ सदस्यांचा गट करण्याची तयारी चालवली होती आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले होते; परंतु अपक्ष नगरसेवक राजू तनवाणी यांनी १४ अपक्षांना एकत्र आणले अन् शहर विकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे भाजपला एकही अपक्ष सदस्य मिळू शकला नाही तसेच सेनेच्या गटाचेही काही सदस्य कमी झाले.

शिवसेनेकडून स्थानिक नेत्यांनी आघाडीतील सदस्यसंख्या वाढवण्यासाठी महापौरपदाची निवडणूक झाल्यापासून प्रारंभ केला होता. सेना नेतृत्व करत असल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच भाजपचा गट होऊ शकला नसल्याचे सूत्रांनी खासगीत बोलताना सांगितले. भाजपने गट करून सदस्यसंख्या वाढवली असती तर स्थायी समितीत त्यांचा एखादा सदस्य जास्तीचा जाऊ शकला असता.
बातम्या आणखी आहेत...