आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे ५० कर्मचारी मोहिमेवर तरीही १५ लाखांचीच करवसुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेच्यातिजोरीत खडखडाट असून मनपाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे अग्रिम आणि दिवाळी भेट यामुळे तिजोरीवर जास्तीचा दीड कोटी रुपयांचा भार पडणार आहे. करवसुलीतून ही रक्कम मिळवण्यासाठी शुक्रवारी मनपाच्या वतीने अचानक आठ वॉर्डातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना घेऊन रेल्वेस्टेशन ते क्रांती चौक रस्त्यावर करवसुली मोहीम राबवण्यात आली. मात्र दिवसभरात केवळ १५ लाख ५० हजार रुपये वसूल करण्यात यश आले.

मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मालमत्ता कराची वसुली २५० कोटींवर कशी जाईल याकडे लक्ष केंद्रित केले आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाण्यासाठी दरवर्षीपेक्षा जास्त अग्रिम आणि दिवाळी भेट देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या मनपाचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. दिवाळीपूर्वी मनपाला दीड कोटींची तरतूद करून कर्मचाऱ्यांना वाटप करावी लागणार आहे. त्यासाठी कर वसुली वाढवण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. त्यानुसार मालमत्ता कर आकारणी अधिकारी वसंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आठ वॉर्डातील ५० कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले होते. सकाळी १० ते या वेळेत क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रोडवरील २२६ मालमत्तांची कसून तपासणी केली. दिवसभर सर्व अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील व्यावसायिक मालमत्तांची तपासणी करून कराचा भरणा केला किंवा नाही याची माहिती घेत होते.
बहुसंख्य व्यापारी, दुकानदारांकडे मागील बाकी नसून केवळ चालू आर्थिक वर्षाचीच बाकी असल्याचे दिसून आले. त्यामुळे काही जणांनी जागेवर कर भरल्याने एवढा मोठा फौजफाटा असूनही मनपा अधिकाऱ्यांच्या पदरात दिवसभरात केवळ १५ लाख ५० हजार रुपये पडले. गेल्या महिन्यात कॅनॉट प्लेस परिसरात कर वसुलीसाठी मोहीम राबवण्यात आली होती. त्या वेळी मात्र मनपाला कोटी ५२ लाख रुपये वसूल करण्यात यश आले होते. या मोहिमेत मात्र वसुली अधिकाऱ्यांच्या हाती मोठे यश आले नाही. अशाच मोहिमा वॉर्डात आणि शहरातील सर्व मुख्य बाजारपेठांमध्ये राबविल्यास मोठ्या प्रमाणात कर संकलित करण्यात येऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.
शासकीय कार्यालयांना ब्रेक
या रस्त्यावर मोठ्या संख्येने शासकीय आणि निमशासकीय कार्यालये आहेत. मात्र यांची मोजणी करता त्यांनी कर भरला अथवा नाही याची साधी चौकशीही करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. दिवसभरात केवळ व्यावसायिक मालमत्तांची मोजणी करण्यात आली. त्यांनीही कर भरलेला असल्याने या मोहिमेला फार यश मिळाले नाही.
बातम्या आणखी आहेत...