आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिघांचा अपवाद वगळता नवख्यांची 'स्टँडिंग कमिटी'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेची स्थायी समिती पुढील वर्षभर नवख्यांची समिती म्हणून ओळखली जाईल. कारण यात गजानन बारवाल, मोहन मेघावाले कमल नरोटे हे दोन-तीन सदस्य वगळता उर्वरित १३ जण नवखे आहेत. ते पहिल्यांदाच नगरसेवक झाले अन् आता तिजोरीच्या किल्ल्या हाती असलेल्या या सभागृहातही पोहोचले आहेत. त्यामुळे बारवाल मेघावाले हेच हे सभागृह चालवतील, अशी चिन्हे आहेत. नव्या सदस्यांना महानगरपालिका तसेच ही समिती समजेपर्यंत त्यातील निम्म्या सदस्यांचा कालावधी संपून जाईल.

स्थायी समिती सदस्यांचा कालावधी दोन वर्षांचा असला तरी पहिल्या वर्षी नियुक्त झालेल्या सदस्यांतून निम्मे (८) सदस्य एका वर्षाने निवृत्त होतात. स्थायी समितीवर भाजपकडून महापौरपदाच्या वेळी डावलले गेलेले नितीन चित्ते तसेच खासदार रावसाहेब दानवे यांच्या गोटातील दिलीप थोरात यांना संधी देण्यात आली. सभापतिपद भाजपकडे असल्याने या दोघांत या पदासाठी चुरस आहे. महापौरपदाच्या वेळी झालेल्या अपमानाचे पापक्षालन म्हणून चित्ते यांना सभापतिपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा असली तरी चमत्कार होईल अन् नवखा असलो तरी मी सभापती होईन, अशी अपेक्षा थोरात हेदेखील ठेवून आहेत. पुढील आठवड्यात सभापतिपदाची निवडणूक होणार असून सभापती कोण याचे उत्तरही लगेचच मिळणार आहे.
चित्ते हे नवखे असले तरी गतवेळी त्यांच्या पत्नी नगरसेविका होत्या. त्यामुळे त्यांना एकार्थाने पालिका कामकाजाचा अनुभव आहे. तर संघटनेत अनेक वर्षे काम केल्यानंतर प्रथमच नगरसेवक झालेले थोरात आधी पालिकेचे कामकाज समजण्यासाठी प्राधान्य देतात की पदासाठी प्रयत्न करतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे. सभापतिपदाचा उमेदवार प्रदेश पातळीवर ठरणार असल्याने भाजपचे स्थानिक पदाधिकारी खासगीतही या विषयावर बोलण्याचे टाळत असल्याचे दिसून आले.
नव्या सदस्यांना कामकाजाची पद्धत शिकवणे, कायद्याचा अभ्यास करायला लावणे, येथील संकेत तसेच अन्य बाबी शिकवण्याचे काम ज्येष्ठांना करावे लागणार आहे.

नूतन सदस्य असे
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (६): मोहनमेघावाले, रावसाहेब आमले, कमलाकर जगताप, गजानन मनगटे, मकरंद कुलकर्णी, ज्योती पिंजरकर.

भाजप (३): नितीनचित्ते, दिलीप थोरात, कमल नरोटे.
इत्तेहाद एकताआघाडी (४): विकासएडके, खान इर्शाद इब्राहिम, शेख समीना इलियास अब्दुल रहिम नाईकवाडी.

शहर विकासआघाडी (२): गजाननबारवाल ज्योती मोरे
संयुक्त लोकशाहीआघाडी (१)- रेश्माअशफाक कुरेशी.
बातम्या आणखी आहेत...