आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi

मनपाच्या 400 कर्मचार्‍यांची निवडणूक कामाला दांडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामासाठी सर्वच शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांतील कर्मचारी घेतले आहेत. यात महानगरपालिकाही मागे नाही. पालिकेचे 400 कर्मचारी या कामासाठी घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील अनेक जण ना इकडे, ना तिकडे असल्याचे समजते. पालिकेचे काही कर्मचारी तर वर्षानुवर्षे आयोगाच्या कामाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातच मुक्कामी आहेत.


नेहमीपेक्षा यंदा आयोगाला लागणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या वाढली. त्यामुळे प्रत्येक विभागातून घेण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या वाढली. त्यात पालिकेचा सहभाग मोठाच आहे. साडेचार हजार कर्मचार्‍यांपैकी 400 कर्मचारी निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आले आहेत. यात शहर अभियंता सखाराम पानझडे यांचाही सहभाग आहे. विशेष म्हणजे पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांनाही यातून वगळण्यात आलेले नाही.


अत्यावश्यक सेवा म्हणून या विभागाच्या कर्मचार्‍यांना निवडणूक सेवेतून वगळणे अपेक्षित असतानाही या विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारीही निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आले आहेत. कर्मचारी पूर्णवेळ आयोगाच्या कामात असतात; परंतु वरिष्ठ अधिकार्‍यांना तिकडचे काम सांभाळून दैनंदिन कामालाही वेळ द्यावा लागतो.