आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation News In Marathi, Revenue Collection

मनपाची मालमत्ता करवसुली 95 कोटींपर्यंतच होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मालमत्ता करवसुलीचे टार्गेट 100 कोटी रुपयांचे असले तरी 31 मार्चपर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली 90 ते 95 कोटींच्या वर जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात मनपाला करवसुली वाढवण्यासाठी नवीन शक्कल लढवावी लागणार आहे.


महानगरपालिकेने 2007 पासून शहरात मालमत्तांचे सर्वेक्षणच केले नसल्याने करवसुलीचे टार्गेट आहे तेथेच आहे. प्रत्यक्षात मनपाकडे नोंद असलेल्या 1 लाख 87 हजार मालमत्तांपेक्षा किती तरी अधिक मालमत्ता आज कर न भरता उभ्या आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रामाणिकपणे कर भरणार्‍या नागरिकांच्या जिवावरच मनपाची करवसुली चालते. यंदादेखील मनपाची मालमत्ता व पाणीपट्टीची करवसुली 90 ते 95 कोटींच्या वर जाणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.


मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले की, पाणीपट्टी वसुली 25 कोटींच्या आसपास होईल असे आजचे चित्र आहे. मालमत्ता कराचे उत्पन्न वाढवण्यासाठी काही उपाय हाती घेतले जातील, असेही ते म्हणाले. मालमत्ता सर्वेक्षण कसे करायचे व ते मनपाच्या कर्मचार्‍यांकडून करायचे की खासगी एजन्सीकडून करायचे याबाबत चाचपणी सुरू आहे. प्रोझोन मॉलच्या कराबाबत ते म्हणाले की, प्रोझोनने रस्त्यावर साडेचार कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याचे आता करात समायोजन करण्यात आले आहे. यापुढे अशा प्रकारच्या सवलती न देण्याचे ठरवण्यात आले असून सवलत द्यायचीच असेल तर त्या आधी त्याबाबत एक धोरण ठरवणे आवश्यक आहे.