आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटी ३० लाख दिल्यावर ठेकेदाराने सुरू केले काम, आधी अपूर्ण रस्ते करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या दोन वर्षांपासून खराब रस्त्यांवरून ये-जा करताना नागरिकांचा जीव नकोसा होत असताना राजकीय पुढाऱ्यांनी मात्र निवडणुकीवर डोळा ठेवत व्हाइट टाॅपिंगच्या ठेकेदारावर दबाव आणत त्याला भरमसाट रस्त्यांची कामे सुरू करायला लावली. दुसरीकडे मनपाने पैसे दिल्याने हताश झालेल्या ठेकेदाराने अखेर सगळीच कामे बंद केल्याचे आता समोर आले आहे. आता मनपाने संबंधित ठेकेदाराला कोटी ३० लाख रुपयांचे बिल देत आधी अर्धवट रस्ते पूर्ण करून मगच नवीन कामांना हात घालण्याचे निर्देश दिले आहेत. परिणामी पाच रस्त्यांची कामे लांबणीवर पडणार आहेत.
औरंगाबाद शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची चाळण झाल्यावर मनपाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांची कामे सुरू केली. शहरातील सगळे प्रमुख रस्ते व्हाइट टाॅपिंग तंत्राने करण्यासाठी ४४ कोटी रुपयांचा खर्च करण्याची तयारी दर्शवण्यात आली. पहिल्या टप्प्यात चार प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. नंतर त्यात एकएक रस्ता वाढत गेला. दुसरीकडे मनपाने वेळेवर बिल देण्याचा शब्द पाळला नाही. परिणामी ठेकेदाराने एक एक करून कामे बंद केली जवळपास दोन महिने व्हाइट टाॅपिंगची कामेच बंद राहीली.
नगरसेवकाची तक्रार
नगरसेवकदिग्विजय शेरखाने यांनी नाईक काॅम्प्लेक्स ते गोकुळ स्वीट्स या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे सांगत काँक्रीटला अनेक ठिकाणी भेगा पडत असून काही ठिकाणी रस्ता खचलाही आहे. या कामाचा दर्जा चांगला नसल्याने लोकार्पणापूर्वीच रस्ता खराब झाल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
महापौर म्हणतात लोक विचारतात
महापौरकला ओझा यांनी आज मनपा आयुक्त पी. एम. महाजन यांना पत्र देत शहरातील रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले. रस्त्यांची सगळी कामे रखडली आहेत. लोक आम्हाला वारंवार विचारणा करत आहेत. कामे पूर्ण झाल्यास जबाबदारी मनपावर राहील असे त्या म्हणाल्या.
दबावाने केला विचका
लोकसभेपाठोपाठविधानसभेच्या निवडणुका आल्याने मतदारांची नाराजी नको म्हणून पुढाऱ्यांनी शहरात जास्तीत जास्त ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत हे चित्र नागरिकांना दिसले पाहिजे यासाठी शिवसेनेने दबाव आणत विविध भागांत रस्त्यांची कामे हाती घ्यायला लावली. परिणमी सगळीकडे खोदाखोद झाली पण एकही काम धड पूर्ण झाले नाही. विधानसभेच्या तयारीसाठी तर पूर्व, पश्चिम मध्य या तिन्ही मतदारसंघांत सारखीच कामे सुरू आहेत. हे समोर यावे यासाठी आटापिटा करण्यात आला.
कामे पुन्हा सुरू झाली
सध्याया व्हाइट टाॅपिंगच्या रस्त्यांची कामे पुन्हा सुरू झाली आहेत. त्याबाबत स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे म्हणाले की, ठेकेदाराला कोटी ३० लाख रुपयांचे बिल मागच्याच आठवड्यात देण्यात आल्यानंतर त्याने कामाला प्रारंभ केला आहे.
आधी अपूर्ण कामे
वाघचौरेम्हणाले की, मनपाने या कामांबाबत ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता त्याने एकदम सगळी कामे सुरू करता जी कामे अर्धवट आहेत ती आधी पूर्ण करावीत नंतरच नव्या कामांना हात घालावा असे बजावण्यात आले आहे. त्यामुळे काही रस्ते तरी लगेच पूर्ण होऊ शकतील.
पहिली कामेही अर्धवट
आमची निवडणूक आहे, अडचण नको, हा रस्ता सुरू करा, तो सुरू करा असे सांगत पुढाऱ्यांनी दबाव आणल्याने ठेकेदार गांगरून गेला. कामे सुरू करण्यात आली. दुसरीकडे मनपाने बिल द्यायची वेळ आल्यावर हात वर केल्याने सगळाच विचका झाला.