आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Scad Check To Fruit Treading

मनपाची पथके तपासणार फळ व्यापार्‍यांची गोदामे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कृत्रिम पद्धतीने रसायनांचा वापर करून पिकवलेले आंबे आणि इतर फळांची सर्रास विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मनपाने व्यापार्‍यांच्या गोदामांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंब्यांच्या मोसमात घातक रसायनांनी पिकवलेल्या आंब्यांची सर्रास विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यानंतर महापौर कला ओझा यांनी यासंदर्भात माहिती घेऊन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने संयुक्त मोहीम राबवत तपासणी करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्तांना पत्र दिले आहे. त्यात शहरातील फळविक्रेते तसेच घाऊक व्यापारी यांच्या गोदामांची तपासणी करून अहवाल द्यावा, असे महापौरांनी म्हटले आहे.