आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाही-नाही म्हणत औरंगाबाद - नवी मुंबई महापालिकेत सेना-भाजप युती, आघाडीत बिघाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगर पालिका निवडणुकीत शिवसेना- भाजप युती होते की विधानसभेप्रमाणे एकमेकांविरोधात लढून तिसर्‍याचा फायदा करतात, अशी अनेक दिवसांपासून सुरु असलेली चर्चा अखेर सोमवारी सायंकाळी संपली. शिवसेना-भाजपची अखेर युती झाली. मात्र, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची घडी पालिका निवडणुकीतही बसू शकली नाही. उद्या (मंगळ‌वार) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारखी आहे.
औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकेत शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती झाली आहे. भाजप पक्षाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी युतीची घोषणा केली. औरंगाबादमध्ये सेनेला 64 तर भाजपला 49 जागा सोडण्यात आल्या आहेत. नवी मुंबईसाठी शिवसेना 68 आणि भाजप 43 असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे.
उमेदवार यादी जाहीर करण्याची टाळाटाळ
युती झाली आणि आघाडीत बिघाडी झाली असली तरी, चारही प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी सोमवारी जाहीर केली नाही. यामागे बंडोबांना संधी मिळू न देण्याची वरिष्ठांची रणनीती असल्याचे खासगीत बोलले जात आहे. मात्र, त्याचवेळी पक्षाने तयार केलेल्या यादीतील अधिकृत उमेदवारांना गुपचूप बी फॉर्म वाटण्यात आले आहेत. त्याची वाच्यता न करण्याचा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे.

काँग्रेस 113 जागा लढवणार
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊ शकली नाही. काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घातले आहे, मात्र राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचे त्यांना जमलेले नाही. आघाडीत बिघाडी झाल्यानंतर दोन्हीही पक्षांनी उमेदवारांना बी फॉर्म वाटप सुरू केले. काँग्रेसने सोमवारी सायंकाळपर्यंत सर्व 113 वार्डात उमेदवारांना बी फॉर्म दिले आहेत. मात्र त्यांनी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.