आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत शिवसेना 28, MIM ला मिळाल्या 25 जागा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छाया : अरुण तळेकर, दिव्य मराठी)
औरंगाबाद - महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेना - भारतीय जनता पक्ष आणि रिपाई महायुतीला 50 जागा मिळाल्या आहेत. बहुमतापासून सात जागा मागे आहेत. तर प्रथमच पालिका निवडणूक लढवत असलेला एमआयएम 25 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर काँग्रेस 10, बहुजन समाज पक्ष 5, राष्ट्रवादी काँग्रेस 3, रिपब्लिक डेमोक्रॅटिकला 2 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, शिवसेनेचे उमेदवार सचिन खैरे यांच्या पराभवानंतर औरंगाबादची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या गुलमंडी परिसरात तणावाचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली आहेत.
काँग्रेस कमकुवत करण्याचा प्रयत्न
एमआयएमला मोठे करुन काँग्रेसची पारंपारिक मते वळवायची व काँग्रेसला कमकुवत करण्याचा भाजप-सेना युतीचा डाव असल्याचे महापालिका निवडणूक निकालावरुन उघड झाल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी दिली.
'बाण हवा की खान हवा' या मुद्यामुळे राज्याचे लक्ष्य या निवडणूकीकडे लागून राहिले आहे. महायुती सत्तेच्या दिशेने आगेकूच करताना दिसत असली तरी शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. त्याचा फटका शिवसेनेला बसल्याचे पहिल्या निकालातूनच दिसले आहे. विद्यमान महापौर आणि शिवसेनेच्या उमेदवार कला ओझा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने पराभव केला आहे.

प्रतिष्ठेच्या लढतीत सेना पराभूत
शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेचा केलेल्या गुलमंडी वॉर्डमधून अपक्ष उमेदवार राजू तनवाणी यांचा विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आणि खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांचा पराभव केला आहे. राजू तनवाणी हे भाजप नेते किशनचंद तनवाणी यांचे बंधू आहेत. येथे चुरशीची लढत झाली. खैरेंनी ही लढत प्रतिष्ठेची केली होती.
खासदार खैरे यांच्या एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू
शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे विजयी झाले असून पुतणे सचिन खैरे यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव झाला आहे. अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या उच्चभ्रू लोकवस्तीच्या समर्थनगर वार्डमधून ऋषिकेश खैरे विजयी झाले आहेत. खासदार खैरे बुधवारी अर्धादिवस गुलमंडीत ठाण मांडून बसले होते मात्र पुतण्या सचिनला विजयी करण्यात ते अपयशी ठरले.
पहिला निकाल
महापालिकेचा पहिला निकाल आला असून तो शिवसेनेसाठी धक्कादायक आहे. बाळकृष्णनगर वार्ड येथून विद्यमान महापौर आणि शिवसेनेच्या उमेदवार कला ओझा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ज्योती मोरे यांनी पराभव केला आहे. विद्यानगर मधून विभक्त करण्यात आलेला बाळकृष्णनगर वार्ड आहे. येथील नागरिकांनी रस्त्याची मागणी केलेली होती.ती महापौर असताना कला ओझा यांना पूर्ण करता आलेली नव्हती. त्यामुळे त्यांचा पराभव झाला असण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केले आहे.
औरंगाबाद महापालिका निकाल

वार्ड क्र. 01 हर्सूल - पुनम बामणे - भाजप
वार्ड क्र. 02 भगतसिंगनगर बन्सी जाधव - शिवसेना
वार्ड क्र.03 एकतानगर रुपचंद वाघमारे - अपक्ष
वार्ड क्र.04 चेतनानगर/राजनगर ज्योती अभंग - अपक्ष
वार्ड क्र.05 वानखेडेनगर राजगौरव हरिदास वानखेडे - भाजप
वार्ड क्र.06 यादवनगर एन : रोजतकर पुष्पा उत्तमराव - भाजप
वार्ड क्र.07 मयूर पार्क - विजय औताडे - भाजप
वार्ड क्र.08 सुरेवाडी - सीताराम सुरे - शिवसेना
वार्ड क्र.09 मयूरनगर, सुदर्शननगर - स्वाती नागरे - अपक्ष
वार्ड क्र. 10 रोजाबाग, भारतमातानगर - मोहन मेघावाले - शिवसेना
वार्ड क्र. 11 हर्षनगर, विश्वासनगर - अय्यूब खान हुसैन खान - काँग्रेस
वार्ड क्र. 12 बेगमपुरा/पहाडसिंगपुरा ज्ञानोबा जाधव - शिवसेना
वार्ड क्र. 13 भिमनगर उत्तर- आशा निकाळजे, अपक्ष विजयी
वार्ड क्र. 14 पडेगाव - सुभाष शेजवळ - शिवसेना
वार्ड क्र. 15 मिटमिटा - रावसाहेब राधाकिसन आमले - शिवसेना
वार्ड क्र. 16 भीमनगर भावसिंगपुरा (द.) मनिषा विनोद लोखंडे - शिवसेना
वॉर्ड क्र. 17 - नंदनवन- शांतीपुरा - प्रेमलता मिलिंद दाभाडे - बहुजन समाज पक्ष
वार्ड क्र. 18 जयसिंगपुरा - अफसर खान यासिर खान - काँग्रेस
वार्ड क्र. 19 आरेफ:प्रगती कॉलनी - कादीर जमीर अहेमद रहीम अहेमद - एमआयएम
वार्ड क्र. 20 जयभीमनगर आसेफिया कॉलनी - सय्यद मतिन रशिद - एमआयएम
वार्ड क्र. 21 कबाडीपुरा : बुढीलेन - शकीला बेगम फैजुद्दीन - एमआयएम
वार्ड क्र. 22 लोटाकारंजा - तसनीम बेगम अब्दूल रऊफ - एमआयएम
वार्ड क्र. 23 चेलीपुरा: काचीवाडा - खान सायरा बानो अजमल - एमआयएम
वॉर्ड क्र. 24 - शहाबाजार - सय्यद सरवतबेगम आरेफ हुसैनी - एमआयएम
वार्ड क्र. 25 गणेश कॉलनी - नासेर सिद्दीकी - एमआयएम
वार्ड क्र. 26 नेहरूनगर - शेख नरगीस सलीम - एमआयएम
वार्ड क्र. 27 शताब्दीनगर - खान जहाँगिर मुलानी - एमआयएम

वार्ड क्र. 28 स्वामी विवेकानंदनगर - सीमा गणपत खरात - शिवसेना
वॉर्ड क्र. 29 - श्रीकृष्णनगर - शोभा वळसे - भाजप
वॉर्ड क्र. 30 - पवननगर - चित्ते नितीन - भाजप
वॉर्ड क्र. 31 - शिवनेरी कॉलनी - ज्योती पिंजरकर - शिवसेना
वॉर्ड क्र. 32 - आंबेडकरनगर - भारती महेंद्र सोनवणे - बसप
वार्ड क्र. 33 मिसारवाडी - शबनम बेगम कलीम कुरेशी - काँग्रेस
वार्ड क्र. 34 आरतीनगर, भक्तीनगर - संगीता सुभाष वाघूले - एमआयएम
वार्ड क्र. 35 नारेगाव - मलके गोकूळसिंग संपतसिंग - अपक्ष
वॉर्ड क्र. 36 - नारेगाव ब्रिजवाडी - सुरेखा सानप - अपक्ष
वॉर्ड क्र. 37 - चौधरी कॉलनी:चिकलठाणा - वैशाली जाधव - काँग्रेस
वार्ड क्र. 38 एमआयडीसी:चिकलठाणा - राजू रामराव शिंदे - भाजप
वार्ड क्र. 39 अयोध्यानगर - सुरेखा गौतम खरात - भाजप
वार्ड क्र. 40 गणेशनगर - मकरंद कुलकर्णी - शिवसेना
वार्ड क्र. 41 रहेमानिया कॉलनी - खान इरशाद इब्राहिम - एमआयएम
वार्ड क्र. 42 किराडपुरा - नसीम बी सांडू खाँ - एमआयएम
वार्ड क्र. 43 शरीफ कॉलनी - अजीम अहमद रफीक - अपक्ष
वार्ड क्र. 44 रोशन गेट - साजेदा फारुखी सईद फारुखी - एमआयएम
वॉर्ड क्र. 45- कैसर कॉलनी - खतीजा छोटू कुरेशी - अपक्ष
वॉर्ड क्र. 46 - नवाबपूरा - खान फेरोज मोईनुद्दीन - एमआयएम
वार्ड क्र. 47 राजाबाजार - यशश्री बाखरिया - अपक्ष
वार्ड क्र. 48 गुलमंडी - राजू लेखराज तनवाणी - अपक्ष
वार्ड क्र. 49 भडकल गेट-बुढीलेन - गंगाधर ढगे - एमआयएम
वार्ड क्र. 50 कोतवालपुरा गरमपाणी - खान नासिर बेगम - एमआयएम
वार्ड क्र. 51 भोईवाडा : नागेश्वरवाडी - किर्ती महेंद्र शिंदे - अपक्ष
वार्ड क्र. 52 नारळीबाग, खडकेश्वर - विकास प्रकाश एडके - एमआयएम
वार्ड क्र. 53 औरंगपुरा - बबीता विजय चावरिया - भाजप
वार्ड क्र. 54 गांधीनगर : खोकडपुरा - रामेश्वर भादवे - भाजप
वॉर्ड क्र. 55 - भवानीनगर - मनोज बल्लाळ, शिवसेना
वार्ड क्र. 56 - संयनगर - मलेका बेगम हबीब कुरैशी - काँग्रेस
वॉर्ड क्र. 57 - संजयनगर खासगेट - शेख समिना शेख इलियास - एमआयएम
वॉर्ड क्र. 58 - बारी कॉलनी - पठाण आस्मा फिरदोस रफीक पठाण - एमआयएम
वॉर्ड क्र. 59 - इंदिरानगर(द.) बायजीपुरा - जायभाय रमेश - रिपब्लिकन पक्ष (डेमोक्रॅटिक)
वॉर्ड क्र. 60- इंदिरा नगर (उत्तर) बायजीपूरा - शेख जफर अख्तर - एआयएम
वार्ड क्र. 61 अल्तमश कॉलनी - मो. अय्यूब जहागीरदार - एम्आयएम
वॉर्ड क्र. 62 - एन-6, सिडको - शीतल विरभद्र गादगे - शिवसेना
वॉर्ड क्र.63 -आविष्कार कॉलनी एन-6 - नाईकवाडी अब्दुल रहीम शेख - एमआयएम
वॉर्ड क्र. 64 - गुलमोहर कॉलनी, सत्यमनगर - दांडगे शिवाजी भाऊसाहेब - भाजप
वॉर्ड क्र. 65 - सुराणानगर - राखी देसरडा - भाजप
वार्ड क्र. 66 अजबनगर : कैलासनगर - आशा भालेराव - शिवसेना
वार्ड क्र. 67 समतानगर, सिल्लेखाना - जोहराबी नासेर खान - अपक्ष
वार्ड क्र. 68 समर्थनगर - ऋषिकेश चंद्रकांत खैरे - शिवसेना
वार्ड क्र. 69 समतानगर : कोटला कॉ. - रेश्मा अश्फाक कुरेशी - काँग्रेस
वार्ड क्र. 70 पदमपुरा - गजानन बारवाल - अपक्ष
वार्ड क्र. 71 कोकणवाडी: उस्मानपुरा - सरिता अरुण बोर्डे - एमआयएम
वार्ड क्र. 72 क्रांती चौक - शिल्पाराणी वाडकर - शिवसेना
वार्ड क्र. 73 रमानगर - विजया बनकर - बहुजन समाज पक्ष
वॉर्ड क्र. 74 - शिवशंकर/बालाजीनगर - नितीन साळवे - शिवसेना
वॉर्ड क्र. 75 - बौद्धनगर : उत्तमनगर - त्र्यंबक तुपे - शिवसेना
वार्ड क्र. 76 विष्णूनगर - अंकिता अनिल विधाते - राष्ट्रवादी काँग्रेस
वार्ड क्र. 77 जवाहर कॉलनी - जयश्री सुरेंद्र कुलकर्णी - भाजप
वॉर्ड क्र. 78 - विद्यानगर - वैद्य रेणूकादास - शिवसेना
वॉर्ड क्र. 79 - न्यायनगर - मनगटे गजानन - भाजप
वॉर्ड क्र. 80 - एन ३-४, पारिजातनगर - माधुरी देशमुख - भाजप
वॉर्ड क्र. 81 - ठाकरेनगर एन-२ सिडको - सत्यभामा शिंदे - अपक्ष
वॉर्ड क्र. 82 - अंबिकानगर - भाऊसाहेब जगताप - काँग्रेस
वॉर्ड क्र. 83 - मुकुंदवाडी - कमल नरोटे - अपक्ष
वॉर्ड क्र. 84 - ज्ञानेश्वर : मुकुंदवाडी - कमलाकर जगताप - शिवसेना
वॉर्ड क्र. 85 - संजयनगर : मुकुंदवाडी - सुनिता चव्हाण - बहुजन समाज पार्टी
वॉर्ड क्र. 86 - रामनगर - भगवान घडामोडे - भाजप
वॉर्ड क्र. 87 - विठ्ठलनगर - मनोज गांगवे - शिवसेना
वॉर्ड क्र. 88 - कामगार कॉलनी - सोहेल शेख - काँग्रेस
वॉर्ड क्र. 89 - चिकलठाणा - ज्योती नाडे - भाजप
वॉर्ड क्र. 90 - राजनगर : मुकुंदनगर - साळवे अनिता - काँग्रेस
वॉर्ड क्र. 91 - जयभवानीनगर : सिडको - मुंढे मनिषा - भाजप
वॉर्ड क्र. 92 - विश्रांतीनगर - प्रमोद राठोड - भाजप
वॉर्ड क्र. 93 - पुंडलिकनगर - मीना गायके - शिवसेना
वॉर्ड क्र. 94 - गजानननगर - आत्माराम पवार - शिवसेना
वॉर्ड क्र. 95 - बाळकृष्णनगर : शिवनेरी - मोरे ज्योती - राष्ट्रवादी काँग्रेस
वॉर्ड क्र. 96 - गारखेडा : मेहरनगर - विमल केंद्रे - भाजप
वॉर्ड क्र. 97 - रामकृष्णनगर - सीमा चक्रनारायण - शिवसेना
वार्ड क्र. 98 - उल्कानगरी- दिलीप थोरात - भाजप - विजयी
वार्ड क्र. 99 - जय विश्वभारती कॉलनी - अर्चना निळकंठ - भाजप
वार्ड क्र. 100 ज्योतीनगर : दशमेशनगर बिनविरोध - सुमित्रा गिरिजाराम हळनोर - शिवसेना
वार्ड क्र. 101 एकतानगर - लता मगन निकाळजे - एमआयएम
वार्ड क्र. 102 कबीरनगर - राहुल सोनवणे - बहुजन समाज पक्ष
वार्ड क्र. 103 वेदांतनगर - बिनविरोध विकास जैन - शिवसेना
वार्ड क्र. 104 बन्सीलालनगर - सिद्धांत संजय शिरसाठ - शिवसेना
वार्ड क्र. 105 राहुलनगर : सादातनगर - अब्दूल म. नाविद अब्दूल रशिद - काँग्रेस
वार्ड क्र. 106 - कांचनवाडी : नक्षत्रवाडी - विमल जनार्दन कांबळे - अपक्ष
वार्ड क्र. 107 - विटखेडा - नंदकुमार घोडेले - शिवसेना
वार्ड क्र. 108 हमालवाडा - मुल्ला सलिम बेगम खाजोद्दीन - राष्ट्रवादी काँग्रेस
वार्ड क्र. 109 देवानगरी - शोभा गुरुलिंगअप्पा बुरांडे - अपक्ष
वार्ड क्र. 110 मयूरबन कॉलनी - स्मिता दिगंबर घोगरे - अपक्ष
वार्ड क्र. 111 प्रियदर्शिनी : इंदिरानगर - सलिमा कुरेशी - एमआयएम
वार्ड क्र. 112 - शिवाजीनगर - राजेंद्र जंजाळ - शिवसेना
वार्ड क्र. 113- भारतनगर : शिवाजीनगर - कैलास गायकवाड - रिपाई (डेमोक्रॅटिक)
बिनविरोध
वॉर्ड क्रमांक 100 - ज्योतिनगर येथून सुमित्रा गिरिजाराम हळनोर आणि वॉर्ड क्रमांक 103 - वेदांतनगर येथून विकास जैनहे महायुतीचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले. हे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे आहेत.
औरंगाबाद महापालिका 113 निकाल
शिवसेना-भाजप महायुती (शिवसेना-28 भाजप -22) 50
काँग्रेस 10
राष्ट्रवादी काँग्रेस 03
एमआयएम 25
इतर
25
पुढील स्लाईडवर बघा, मतमोजणीनंतर शहरात असा झाला जल्लोष...