आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Municipal Corporation Woman Cleark Arrested

औरंगाबाद मनपाची महिला लिपिक लाच घेताना अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - घराच्या हस्तांतरणाचे आदेश देण्यासाठी सातशे रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेच्या कर आकारणी विभागातील वरिष्ठ लिपिक मंगल के. श्रीकांत यांना सोमवारी (3 जून) अटक करण्यात आली.

शिवाजीनगर अकराव्या योजना वसाहतीत राहणारे विशाल अशोक गिरीकर यांनी घराच्या हस्तांतरणासाठी पालिकेत अर्ज केला होता. अनेक चकरा मारल्यानंतरही काम होत नसल्याने त्यांनी वरिष्ठ लिपिक मंगल के. श्रीकांत यांच्याकडे चौकशी केली. त्या वेळी त्यांनी एक हजार रुपये लाच मागितली. तडजोड केल्यानंतर हा व्यवहार सातशे रुपयात ठरला. लाच देण्याची इच्छा नसल्याने विशाल यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचेची रक्कम कार्यालयात स्वीकारताना मंगल यांना सोमवारी दुपारी साडेतीन वाजता रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस अधीक्षक संजय बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक कैलास प्रजापती, साईनाथ ठोंबरे, पोलिस उपनिरीक्षक ए.व्ही.रायकर, किशोर पवार, हवालदार रावसाहेब वाघ, सुधाकर मोहिते, श्रीराम नाटुरे, अजय आवले, सचिन शिंदे, नितीश बोडखे, मीरा सांगळे यांनी कारवाई केली. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.