आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांची आयुक्तांना सात पत्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तीनच दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना ४९ कलमी तीन पानी निवेदन दिल्यानंतर गुरुवारी महापौर त्र्यंबक तुपे यांनी आयुक्तांना सात विषयांबाबत सात पत्रे दिली आहेत. त्यात एमजीएमच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यापासून सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी करणारे विषय आहेत.

धडाकेबाज शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पदभार स्वीकारताच मागील सात महिन्यांपासून एकही काम झालेल्या पदाधिकारी नगरसेवकांनी आयुक्तांवर पत्र निवेदनांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. २३ नोव्हेंबरलाच महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना एक जंबो तीन निवेदन दिले होते. शहरातील विकासकामे उत्पन्न वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत ४९ कलमी निवेदन आयुक्तांना दिले. त्यावर चर्चाही झाली. या निवेदनात मालमत्ता कर आकारणी, मालमत्ता करांचे पुनर्मूल्यांकन, मनपाच्या मालकीच्या जागा व्यावसायिक दृष्टिकोनातून विकसित करणे, शहरातील पथदिवे सौर ऊर्जेवर चालवणे, रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करणे, प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, विकास आराखड्यातील रस्त्यांचे मार्किंग करून या रस्त्यांवरील अतिक्रमण काढणे, पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करून या जागा खुल्या करून घेणे, चौकांच्या सुशोभीकरणात खासगी कंपन्यांचा सहभाग घेणे मनपातील रिक्तपदे तातडीने भरणे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती.

एमजीएमच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करा
महापौरांनी सात विषयांवरची सात पत्रे आयुक्तांना धाडली. सात वेगवेगळे विषय त्यात उपस्थित करण्यात आले आहेत. एमजीएम संस्थेच्या परिसरात २००६ नंतर बांधलेल्या अनेक इमारतींना कर आकारला जात नसून मनपाचे नुकसान होत आहे. अशा स्थितीत मालमत्ता कर लागलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने कर आकारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.