आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील ‘त्या’ 25 विहिरींमध्ये भरपूर पाणी, तरीही टंचाई कायम; मनपाच्या जलयोजनेचे वाटोळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरभरात असलेल्या जुन्या विहिरींची सफाई करून त्यावर लाखो रुपये खर्च करून मनपाने सांडपाणी जल योजना अमलात आणली. २५  ठिकाणी ही योजना राबवण्यात आली होती, पण देखभालीअभावी या योजनेचा बट्ट्याबोळ झाला. 
 
जलस्रोत असूनही त्याचा उपयोग झाला नाही.  सिडको एन-२ मुकुंदवाडी भागातील तानाजीनगर आणि शिवाजी कॉलनी परिसरातील विहिरींवरील या योजनेची स्थिती कशी झाली हे देत आहोत. त्यावरून एखाद्या चांगल्या योजनेची कशी माती होते हे स्पष्ट होईल.

 शहरात एकूण ४२३ विहिरी आहेत. त्यांची योग्य सफाई केली व सातत्याने देखभाल केली तर त्या त्या भागातील पाणीटंचाई दूर होऊ शकते, हा विचार पुढे आला आणि सातत्याने पडणारा दुष्काळ आणि उन्हाळ्यात दरवर्षी होणारी पाणीटंचाई यावर मात करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी  मनपाने ही योजना अमलात आणली. महापालिकेच्या यांत्रिकी, बांधकाम आणि विद्युत या तीन विभागांनी मिळून शहरातील प्रमुख ठिकाणी असलेल्या विहिरींमध्ये किती व कसा  जलसाठा आहे याचा अंदाज घेतला. काही भागांमधील जवळपास २५ विहिरी निवडल्या आणि त्यावर ही सांडपाणी जलयोजना लागू केली.
 
ओटे, टाक्या बांधल्या
आधी विहिरींची साफसफाई करण्यात आली. गाळ काढून अशा विहिरींच्या जवळ काँक्रीट ओट्यांचे पक्के बांधकाम केले. त्यावर काँक्रीटच्या रेडिमेड साठवण टाक्या उभारून विहिरीतून थेट पाइपलाइन टाक्यांना जोडण्यात आली होती. या साठवण टाक्यांना नळाच्या तोट्या लावण्यात आल्या होत्या. विहिरीतील पाणी थेट साठवण टाक्यांत पडावे यासाठी खास विद्युत पंप बसवण्यात आले होते. त्याद्वारे त्या त्या परिसरात पाणी उपलब्ध झाले.
 
फक्त गाजावाजा केला
गाजावाजा करत  उभारलेल्या या यंत्रणेपासून वसाहतीतील नागरिकांना पाणी देण्यासाठी  कुठलीही खबरदारी मात्र  घेतली गेली नाही. उद्घाटनाच्या दिवशीच साठवण टाक्यांत पाणी पडले. नंतर मात्र त्या कोरड्याठाक पडल्या. आता तर त्यात कचरा आणि प्रचंड घाण साठली आहे. सिडको एन-२ मुकुंदवाडी परिसरातील विहिरींमध्ये ही परस्थिती दिसली. लाखो रुपये खर्च केले. विहिरींवर जाळ्या बसवण्यात आल्या. पण आता त्याच विहिरींमध्ये कचरा, गाळ आणि बाटल्या पडल्या आहेत.
 
सारी यंत्रणा गायब
पाइपलाइनचे तुकडे गायब करण्यात आले आहेत. तर विद्युत पंपासह इतर यंत्रणाही गायब करण्यात आली आहे. कुणी लक्षच न दिल्याने बहुतांश वस्तू एक तर खराब झाल्या आणि काही चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे पाणी समस्या कायम आहे.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, आमचा पूर्ण अपेक्षाभंग झाला...
बातम्या आणखी आहेत...