आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाचा आदेश तरीही खड्ड्यांमध्ये भरली मुरूम, खडी; 24 तासांत दुरावस्‍था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील रस्त्यांवरचे खड्डे दर्जेदार साहित्य वापरून बुजवा. एकदा बुजवलेले खड्डे उखडलेले दिसले तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकू, असा तोंडी इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीन दिवसांपूर्वी दिला. मात्र, त्याकडे मनपा अधिकाऱ्यांनी मुळीच लक्ष दिलेले नाही. दर्जेदार साहित्याऐवजी मुरूम, खडी वापरून खड्डे बुजवण्यात आले असून चोवीस तासांतच त्यातील खडी निघू लागली आहे. 
 
अॅड. रूपेश जैस्वाल यांनी खड्ड्यांविषयी चार वर्षांपूर्वी दाखल केलेल्या याचिकेची खंडपीठात सुनावणी सुरू आहे. त्यात एक सप्टेंबर रोजी न्यायालयाने मनपाच्या कारभाराविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करून खड्डे बुजवण्यासाठी दर्जेदार साहित्य वापरा, असे स्पष्ट केले होेते. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने गणेश विसर्जन मिरवणुकीच्या रस्त्यांची पाहणी केली असता तेथे खड्ड्यांमध्ये फक्त मुरूम आणि खडीच अंथरूण ठेकेदार मोकळे झाल्याचे दिसून आले. बोटावर मोजण्याइतक्याच खड्ड्यांची दबाई झाली आहे. वस्तुतः प्रत्येक वाॅर्ड कार्यालयाला पॅचवर्कसाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
 
त्याचा असा वापर करण्यात आल्याबद्दल नागरिकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. अनेक ठिकाणी खड्डे तसेच राहिले आहेत. महापौर भगवान घडमोडेंकडे विचारणा केली असता त्यांनी दर्जेदार साहित्य वापरूनच खड्डे बुजवल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास आणून दिली असता मला कामांची पाहणी करण्यास वेळच मिळाला नाही, असे म्हणत प्रश्नाला बगल दिली. 
बातम्या आणखी आहेत...