आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Govt_High_High:...तर तोळामासा झालेली औरंगाबाद मनपा बार प्रेमापोटी 1700 कोटी अंगावर घेणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एकीकडे महावितरणचे वीज बिल थकल्याने चार दिवस शहर अंधारात होते. पाण्याच्या वीज बिलाचीही हीच स्थिती आहे. ठेकेदारांची बिले थकल्याने विकासकामे रखडली आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन काढताना नाकीनऊ येते. त्यात  शहरातील आहे ते रस्ते सांभाळणे कठीण झाले आहे. खड्डे बुजवतानाच दमछाक होते.
 
अशी सगळी भयानक अवस्था असताना मनपातील सुज्ञ नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकारी बार प्रेमापोटी शहरातून जाणारे हायवे ताब्यात घेण्याची कसरत करत आहेत. त्यासाठी एक, दोन नव्हे, तब्बल १७०० कोटींचा बोजा पडणार आहे. शिवाय काही वर्षांत देखभाल दुरुस्तीचा खर्च येईल तो वेगळाच.  
 
राष्ट्रीय तसेच राज्य  महामार्गापासून ५०० मीटरपर्यंतचे बार तसेच दारूविक्रीची दुकाने बंद झाली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्यांनी शहरातून जाणारे हायवे जळगाव, लातूर, मुंबई महापालिकांप्रमाणे औरंगाबाद मनपाने ताब्यात घेतल्यास न्यायालयाचा निर्णय लागू राहणार नाही, शिवाय मद्यप्रेमी, व्यापाऱ्यांचीही बंदीतून सुटका होईल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना शहरातील नगरसेवक, पदाधिकारी आणि खुद्द मनपातील अधिकाऱ्यांचीही साथ मिळत अाहे. पीडब्ल्यूडीनेही मोलाचा सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे पक्षभेद विसरून सारे यासाठी एकत्र आले आहेत.

औरंगाबाद ही ‘पर्यटननगरी’ आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी पर्यटक येतात. न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना मद्यासाठी भटकंती करावी लागते. बंदी लागू झाल्यापासून धंद्याला फटका बसला असून भविष्यात पर्यटकांची संख्या रोडावू शकते, असा दावा करत हायवेलगतचे बार पुन्हा सुरू करावेत यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
 
बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांंनी महापौर भगवान घडामोडे यांची भेट घेतली. पर्यटक ज्या हॉटेलमध्ये थांबतात तेथेच मद्य प्राशन करतात. ते प्रामुख्याने मुख्य रस्त्यांवरील हॉटेलात थांबतात. याचा विचार पालिकेने करावा आणि हे रस्ते पालिकेच्या ताब्यात घ्यावेत, अशी मागणी केली. अनेक कॉर्पोरेट बुकिंग या निर्णयामुळे रद्द झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर नगरसेवकांशी चर्चा करून सभेत प्रस्ताव ठेवू, असे महापौर म्हणाले.
 
लगेच आकडेमोड सुरू
दुसरीकडे शहरात किती पर्यटक येतात. ते जास्तीत जास्त कुठल्या हॉटेलांमध्ये थांबतात. शिवाय कोणत्या रोडवर किती बार आहेत, याची गणितेही तयार केली जात आहेत. विदेशी पर्यटकांचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. हे बहुतांश पर्यटक पंचातरांकित हॉटेल्समध्ये राहतात, पण पर्यटकांच्या नावावर बार वाचवताना सरसकट सूट मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
आयुक्तांचे मौन...
पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी या घडामोडींवर कोणतेही भाष्य केले नाही. त्यांनी फक्त भविष्यात हे रस्ते आपल्याकडे आले तर किती खर्च येईल याचे आकडे प्राधिकरणाकडून मागवून घेतले अाहेत. 
 
बार असोसिएशनची मागणी...
बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांंनी महापौर भगवान घडामोडे यांची भेट घेतली. पर्यटक ज्या हॉटेलमध्ये थांबतात तेथेच मद्य प्राशन करतात. ते प्रामुख्याने मुख्य रस्त्यांवरील हॉटेलात थांबतात. याचा विचार पालिकेने करावा आणि हे रस्ते पालिकेच्या ताब्यात घ्यावेत, अशी मागणी केली. अनेक कॉर्पोरेट बुकिंग या निर्णयामुळे रद्द झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर नगरसेवकांशी चर्चा करून सभेत प्रस्ताव ठेवू, असे महापौर म्हणाले. त्यामुळे लवकरच तसा प्रस्ताव सभेसमोर येऊ शकतो. 
 
१६ हजार विदेशी पर्यटकांचा मुक्काम...
औरंगाबाद टूर्स अँड ट्रॅव्हल्स गिल्डचे अध्यक्ष जसवंतसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, वार्षिक १६ हजार पर्यटक शहरात मुक्कामी असतात. यापुढे त्यांना दारू पिण्यासाठी मुख्य रस्त्यापासून ५०० मीटर अंतरावरील हॉटेलांत जावे लागेल. विशेष म्हणजे शहरातील सर्व तारांकित हॉटेल्स हे महामार्गावरच आहेत. 
 
पुढील स्लाइडवर वाचा... काय म्हणतात नागरिक...?  काय म्हणतात पदाधिकारी...? महापौर भगवान घडामोडे यांना थेट सवाल... आणि  राज्यभरातील महामार्गावरील मद्यालये... औरंगाबादमध्ये कोणत्या रोडवर किती आहेत बार...?
 
बोला बिनधास्त:- हायवेवरील मद्यालये बंदीमुक्त करण्याच्या मनपाच्या हालचालींबद्दल आपले रोखठोक मत आपण छायाचित्रांसह divyamarathi.com चे फेसबुक पेज www.facebook.com/Marathi.Divya येथे नोंदवू शकता.

हेही वाचा....
#Govt_High_High: राजकारणी, अधिका-यांचा 'काॅकटेल': बार वाचवण्यासाठी पीडब्ल्यूडीची डिनोटिफाय मोहीम

VIDEO: पुण्यात बाणेर येथे भरधाव कारने मायलेकीला चिरडले, चिमुरडीनंतर आईचाही मृत्यू

पाळधीजवळ ट्रॅक्टर कलंडला; चालक ठार, सांगवीजवळ ट्रकच्या धडकेत 5 जण जखमी

जळगावातील 6 रस्त्यांवरील 45 दारू दुकाने, वाइन शॉप, बिअरबार सुरू

केंद्राची परवानगी न घेताच महामार्गाचे हस्तांतरण, दारू दुकाने वाचवण्याच्‍या नादात राज्य शासनाची घाई

राज्य गुप्तवार्ता विभागाने घेतली रस्त्यांची माहिती, ट्विटरवर केलेल्या तक्रारीची पीएमओकडून दखल

दारू दुकाने वाचवण्यासाठी आमदार भोळेंकडून रस्ते हस्तांतरणासाठी प्रयत्न, डॉ.राधेश्याम चौधरींचा आरोप

जळगावातील दारू दुकानमालकांना राज्य शासनाकडून दिलासा, शासनाचा घाईगर्दीत निर्णय

यावलमध्ये दारूची दुकाने, बिअरबार वाचवण्यासाठी धडपड, 13 दुकाने आठवड्यापासून पडली आहेत बंद

जळगावात बिअरबार बंद करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम, 500 जणांच्या सह्या

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...