आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेकडे कोट्यवधींच्या वीज बिलाची थकबाकी, तरीही दिवसा 124 दिव्यांचा 'उजेड' पाडून होतेय उधळपट्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एकीकडे तिजोरीत खडखडात असल्याने वीज बिलाची कोट्यवधींची थकबाकी थकली आहे. पण असे असतानाही शहरभरात मनपाचा दिवसा ‘उजेड’ पाडण्याचा प्रकार सुरूच आहे.
 
सिडको एन-३ परिसरातील एच सेक्टर, शहीद भगतसिंगनगर, जी सेक्टर, एफ सेक्टर, सी सेक्टर आणि गुरुसहानीनगरातील तिरुपती पार्क भागात सलग २४ तासांपासून दिवसाढवळ्या थोडथोडके नव्हे तर तब्बल १२४ दिवे सुरू आहेत. जनतेच्या पैशांतून ही नासाडी सुरू आहे. इकडे ही परिस्थिती आहे, तर तिकडे स्वत:च्याच स्विमिंग पुलावर संध्याकाळी दिवे लावण्यासाठी मनपाकडे पैसे नाहीत.
 
यापूर्वी महावितरणची कोट्यवधींची थकबाकी असल्याने चार दिवस शहर काळोखात होते. मुख्य प्रशासकीय इमारतीसह काही वॉर्ड कार्यालये, वाचनालये, व्यायामशाळा, समाजमंदिरे, एवढेच नव्हे तर मनपाच्या रुग्णालयांचाही महावितरणने विजपुरवठा खंडित केला होता. एवढी नामुष्की होऊनही मनपाचा विद्युत विभाग मात्र विजेची उधळपट्टी करत आहे. दोन दिवसांपूर्वीच मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी वीज नासाडीबाबत काळजी घेणार असल्याचे सांगितले होते. पण अधिकाऱ्यांच्या डोक्यात मात्र अजूनही ‘उजेड’ पडलेला नाही हेच यावरून स्पष्ट होते.
 
काय म्हणतात नागरिक?
आज सकाळपासूनलाइट सुरू असल्याचे आढळल्यावर मी मनपाच्या संबंधित विभागाला फोन केला तरीही कुणीही दाद दिली नाही.
- पी.व्ही. कुलकर्णी
 
काल रात्रीपासूनसुरू असलेले दिवे आज दुपारपर्यंत चालू आहेत. अधूनमधून असे प्रकार सातत्याने घडतात. वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे तिचा अपव्यय होऊ नये.
- महेंद्र गायकवाड
 
संंबंधित विभागाकडूनअहवाल मागवतो. दिवसाढवळ्या दिवे का सुरू होती याबाबत नेमका प्रकार समजल्यावर दोषी अधिकारी ठेकेदारांवर कारवाई करतो.
- ओमप्रकाश बकोरिया, आयुक्त,मनपा
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा,
-  शहरातील दिव्‍यांचा महापालिकेने दिवसा पाडलेला उजेड
- पुलावर दिवे लावा; अन्यथा आयुक्तांकडे तक्रार करणार
बातम्या आणखी आहेत...